मराठा आरक्षणावरून जालन्यात तरुणीने संपवले जीवन

Facebook
Twitter
WhatsApp

 

राष्ट्रहित टाइम्स न्यूज नेटवर्क

राज्याच्या राजकारणात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलेला दिसत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सगेसोयरे यांनाही आरक्षण द्यावे अशी मागणी करत हा मुद्दा धगधगत ठेवला आहे. अशातच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एका तरुणीने आपले जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे.

 

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामधील देऊळगाव ताड येथील एका तरुणीने मराठा आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या केली आहे. शिवानी संजय हिवाळे असे या युवतीचे नाव असून तिचे वय १८ वर्षे होते. ही तरुणी बारावी इयत्तेत ७२ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली होती. परंतु, पुढील शिक्षणासाठी लागणारा खर्च परवडणारा नसून घरची परिस्थीतीही अत्यंत हलाखीची असल्याने तिने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. मराठा आरक्षण असते तर शिक्षणासाठी खर्च कमी लागला असता. या विंवचनेत तिने एका चिठ्ठीवर संदेश लिहिल्याचे समोर आले आहे. शिवानी हिने विहिरीत उडी घेऊन जीवन यात्रा संपवली.

शिवानीच्या आतापर्यंतचे शिक्षण हे तिच्या मामांनी केले होते. यापुढे आणखी शिकावे ही इच्छा तिची होती. तिला बी. ए. च्या प्रथम वर्षाला प्रवेश ही घ्यायचा परंतु खर्चामुळे ते शक्य झाले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags