पुणे पोलिसांचा प्रतिबंधात्मक आदेश; कलम १५१ अंतर्गत १४ एप्रिलपर्यंत निषेध, आंदोलन, घोषणाबाजीवर बंदी
पुणे (८ एप्रिल २०२५): शहरातील प्रमुख वैद्यकीय संस्थांपैकी एक असलेल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याने तिच्या नातेवाइकांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले. उपचारात दुर्लक्ष झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर निषेध व्यक्त केला होता. या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून, संभाव्य कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पुणे पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत.
पोलिस उप आयुक्त (विभाग १), पुणे शहर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १५१ नुसार दिनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि त्याच्या १०० मीटर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या आदेशानुसार दोन किंवा त्याहून अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास, घोषणाबाजी करण्यास, आंदोलने, मोर्चे, बॅनर, फलक, पत्रके वाटणे, ध्वनिक्षेपक वापरणे यास पूर्णतः मनाई करण्यात आली आहे.
सदर आदेशाचे मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणे:
रुग्णालय व १०० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारचे आंदोलन, मोर्चा, निदर्शने यास मनाई.
ध्वनिक्षेपक, बॅनर, पत्रके, वाद्य इ. वापरण्यास मनाई.
दोन किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र जमणे निषिद्ध.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता कलम २३३ अंतर्गत कठोर कारवाई.
हा आदेश ८ एप्रिल २०२५ पासून १४ एप्रिल २०२५ पर्यंत प्रभावी राहील. पोलिसांनी यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी संयम बाळगावा आणि शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
पोलिस सह-आयुक्त राजनकुमार शर्मा यांच्या स्वाक्षरीने हा आदेश निर्गमित करण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी सुरु झाली