पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि महाराष्ट्राच्या इतर अनेक जिल्ह्यातून उपचार व शस्त्रक्रियेसाठी पुण्यामध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता पुणे शहरे वैद्यकीय उपचारांचे माहेरघर झालेले दिसते .हॉस्पिटलमध्ये बेसुमार वाढीव लावल्या जाणाऱ्या बिलांवरुन किंवा रुग्णांच्या मृत्यूला जबाबदार धरून हॉस्पिटल प्रशासन व डॉक्टरांशी वादविवादाच्या घटना नेहमीच घडताना दिसतात .मात्र डॉक्टरांशी वाद घालणे ,मारहाण करणे, हॉस्पिटलच्या साहित्याचे नुकसान करणे, हॉस्पिटलची तोडफोड करणे, अजिबात योग्य नाही. अशा पद्धतीने गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. हीच रुग्ण हक्क परिषदेची कायम भूमिका राहिली आहे. मारहाण करणे तोडफोड करणे हे सत्य अहिंसेचे तत्व मानणाऱ्या भारतीय कायद्याला धरून नाही. असे रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले.
पुणे शहराचे पोलीस आयुक्त माननीय नितेश कुमार यांनी डॉक्टरांना मारहाण करणे महागात पडेल ही वस्तुनिष्ठ भूमिका घेतली आहे त्याला रुग्ण हक्क परिषदेचे समर्थन असून जाहीर पाठिंबा आहे.