राष्ट्रहित टाइम्स न्यूज नेटवर्क
केसनंद पुणे: केसनंद ता. हवेली येथे संपूर्ण गावाला अंतर्गत गटार लाईन (ड्रेनेज लाईन) आहेत. परंतु अमर चौक, गायकवाड वस्ती येथे उघड्यावर पाणी सोडले आहे. एखाद्या ओढ्या प्रमाणे पाणी वाहत आहे. ते घाण पाणी, त्यामध्ये मानवी मैला सदृश्य घाण येते. त्या गटार लाईनला अगदी चिटकून नागरिकांची घरे आहेत. अगोदर जुन्या ड्रेनेज लाईन मधून घाण पाणी जात होते. परंतु नंतर नवीन काम केल्यानंतर अक्षरशः पाण्याचे तळे साचले जाते. त्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी, डेंगू ,मलेरिया यासारखे आजार फैलावत आहेत. डासांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. लहान, मुले ,वयोवृद्ध सर्वांनाच या ठिकाणी त्रास होत आहे.
यासंदर्भात वारंवार तोंडी व लेखी पाठपुरावा केल्याची माहिती पुणे जिल्हा वंचितचे उपाध्यक्ष व तेथील रहिवासी अमोल अनिल गायकवाड यांनी सांगितले आहे .
त्याचप्रमाणे अनिल सदाशिव गायकवाड यांनीही लेखी पाठपुरावा केला आहे.
केसनंद गाव औद्योगिक ,वाढते नागरीकरण व महानगरपालिका हद्दी च्या जवळ असलेले गाव आहे. गावामध्ये विविध सुख सुविधा, व बाजारपेठ निर्माण झाली आहे. परंतु एका दलित वस्ती ला अंतर्गत बंदिस्त गटार लाईनचे कामकाज न केल्यामुळे रहिवाशांना त्रास होत आहे.
प्रतिक्रिया: पूर्वी जशी ड्रेनेज लाईन होती तशीच ही लाईन जोडणे गरजेचे आहे. वारंवार ग्रामपंचायत प्रशासनास सांगून सुद्धा येथे कोणी लक्ष देत नाही. तात्पुरत्या स्वरूपात एखादी विद्युत मोटर आणून त्यातून पाणी काढले जाते. परंतु परत त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह चालूच असतो. मैला सदृश्य माती व दुर्गंधी तशीच राहते. मी स्थानिक ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रव्यवहार केला आहे. जर यावर त्वरित कायमस्वरूपी उपाय योजना करावी अन्यथा तीव्र असे आंदोलन करण्यात येईल: अमोल गायकवाड स्थानिक रहिवासी उपाध्यक्ष पुणे जिल्हा वंचित बहुजन आघाडी.