उरळी कांचन (ता. हवेली, जि. पुणे) येथे शासनमान्य भारतीय संगीत गंधर्व महाविद्यालय, पुणे यांच्या वतीने साने संगीत क्लासेस हे परीक्षा केंद्र म्हणून निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हडपसर येथे जावे लागत होते. मात्र आता स्थानिक स्तरावरच परीक्षा घेण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने विद्यार्थी व पालक यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या उद्घाटनप्रसंगी गंधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. प्रमोद मराठे सर, सौ. प्रणिता मराठे मॅडम, मा. श्री. शिरीष केळकर सर, मा. श्री. प्रभू देसाई सर, मा. श्री. अरुण गवई, सौ. सायली शेटे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी साने संगीत क्लासेसचे संस्थापक व संगीत शिक्षक मा. शिवराज साने सर, तसेच सम्राट बहुउद्देशीय जनजागृती संस्थेच्या अध्यक्षा सौ. रेखा साने यांच्यावतीने विद्यार्थ्यांना या केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. तसेच या कार्यात मार्गदर्शक म्हणून डॉ. पराग गाडीलकर सर यांचे विशेष सहकार्य लाभले.
स्थानिक परीक्षाकेंद्र उपलब्ध झाल्याने उरळी कांचन परिसरातील संगीत शिकणाऱ्या सर्व कलावंत विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी सहज उपलब्ध होणार आहे.
👉 सर्व संगीतप्रेमींनी व विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यातआले आहे.