राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
हार्मोनियमची साथ शिवराज साने यांची
थायलंडमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी श्रेयसची निवड
पुणे – अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, पुणे यांच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, शिवाजीनगर येथे २९ मे २०२५ रोजी आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत तबला वादनात श्रेयस रोशन सोनटक्के (वय १२) याने प्रथम क्रमांक मिळवून गौरव मिळवला.
साने संगीत कला मंच, उरुळी कांचन (पुणे) येथील युवा हार्मोनियम वादक शिवराज साने यांनी या सादरीकरणाला उत्कृष्ट साथ दिली. नृत्य, संगीत, गायन, वादन, नाट्य अशा विविध सांस्कृतिक कलाप्रकारांवर ही स्पर्धा केंद्रित होती. श्रेयस सोनटक्के व शिवराज साने यांची तबला-हार्मोनियम जुगलबंदी विशेष कौतुकास्पद ठरली. त्यांनी परीक्षक आणि प्रेक्षकांचे मन जिंकले.
श्रेयसला तबला वादनाचे मार्गदर्शन प्रसिद्ध तबलावादक राजेंद्र नंदकुमार (एन.प्रे.डी.वार) यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून स्नेहा पेटकर, वाघ सर आणि बुलबुल मॅडम यांची उपस्थिती होती.
या यशानंतर श्रेयस रोशन सोनटक्के याची थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संगीत स्पर्धेसाठी निवड झाली असून, पुढील वाटचालीसाठी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
होत आहे.