लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणारा आरोपी दौंड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाकडून २४ तासात जेरबंद*

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी:

दौंड पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक १७ जुलै, २०२४ रोजी रात्री ८.३० वाजे सुमारास दौंड गावचे हद्दीत नगरमोरी चौकामध्ये महिला नामे रुतुजा निलकंठ पुकळे राहणार संभाजी नगर, जिल्हा संभाजी नगर ह्या एसटी बसची वाट पाहत असताना एक पांढ-या रंगाची चारचाकी वाहन घेऊन एक अनोळखी इसम सदर महिलेजवळ येऊन कोठे जायचे आहे.? अशी विचारणा करुन, मी नगरला चाललो आहे, मी तुम्हाला सोडतो असे म्हणून कारमध्ये बसवून, मौजे दौंड गावचे हद्दीत असलेले सोनवडी नदीच्या पुलाजवळ कार थांबवून, सदर महिलेस दमदाटी करुन, महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन बळजबरीने हिसकावून तसेच तिचेकडे असलेली बॅग घेऊन, तिला सदर ठिकाणी सोडून निघून गेल्याबाबतचा दौंड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ५२८/२०२४ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०९ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी डिबी पथकास गुन्ह्याच्या अनुशंगाने सूचना दिल्या. त्यावेळी लागलीच एक टीम तयार करुन, गुन्हा घडला ठिकाणचा सीसीटीव्ही फुटेजचा तसेच गोपनीय बातमीदाराचे आधारे अज्ञात वाहनाचा व आरोपीचा शोध घेतला असता सदरचा गुन्हा हा प्रफुल्ल उर्फ बिंटु प्रकाश पानसरे, वय-२८, राहणार पाटस, ता. दौंड, जि. पुणे याने केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, सदर आरोपी हा वरवंड चौक येथे येणार असल्याचे समजल्याने डि.बी. पथकाने, सापळा रचून गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून गुन्ह्यात चोरलेली सोन्याची चैन व गुन्ह्यात वापलेली कार असे एकूण ५ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपीस अटक करुन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुशंगाने प्राथमिक तपास केला. आरोपीकडून पुणे जिल्हा हद्दीत अशाप्रकारचे गुन्हे केल्याचे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष डोके, स.पो.नि.सुप्रिया दुरंदे, पोलीस हवालदार सुभाष राऊत, नितीन राऊत, पांडूरंग थोरात, शरद वारे, अमीर शेख, पोलीस शिपाई अमोल देवकाते, रविंद्र काळे, योगेश गोलांडे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास मपोसई सुप्रिया दुरंदे या करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags