राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
पुणे शहरात खंडणी विरोधी पथकाने एक महत्त्वपूर्ण कारवाई करताना दोन गुन्हेगारांकडून देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. ही कारवाई एनडीए खडकवासला रोड, कोंढवे धावडे, पुणे येथे 10 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी झाली.
गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलीस अंमलदार प्रफुल्ल चव्हाण व अमर पवार यांनी सापळा रचून अनिकेत विनायक जाधव व गणेश तानाजी किवळे नामे दोन आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलीस निरीक्षक श्री. विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलीस अंमलदार प्रफुल्ल चव्हाण, दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे यांनी सक्रिय भूमिका बजावली.
आरोपींकडून दोन देशी बनावटीचे पिस्टल, तीन जिवंत काडतुसे व 45,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्याची नोंद उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नंबर 17/2025, आर्म्स अॅक्ट 3(2)(25) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) सह 135 अन्वये करण्यात आली आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, खंडणी विरोधी पथक 1, गुन्हे शाखा, पुणे शहर हे करत आहेत. या कारवाईसाठी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त आर्थिक व सायबर (अतिरिक्त कार्यभार गुन्हे) श्री. विवेक मासाळ, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1, श्री. गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शन व सुचनेनुसार कारवाई करण्यात आली
.