राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
यवत पोलीस स्टेशन हद्दीत जबरी चोरी व घरफोडी करणारी एक टोळी यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. या टोळीने एका रात्रीत नेवसेवस्ती खोर, ता. दौंड येथे जबरी चोरी केली होती, ज्यामध्ये फिर्यादी उत्तम शंकर नेवसे यांच्या घरात प्रवेश करून सुरा व कोयत्याचा धाक दाखवून 30,017 रुपये रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेले होते.
चोरी करणारे आरोपी रोहित उर्फ पिल्या प्रविण पवार (रा. आळंदी म्हातोबाची ता. हवेली जि. पुणे), नितीन सुकराज भोसले (वय 31 वर्षे, रा. सुपा ता. बारामती जि. पुणे), रोहित राजेश काळे (वय 22 वर्षे, रा. सुपा ता. बारामती जि. पुणे) आणि आयशाम विलास भोसले (रा. सुपा ता. बारामती जि. पुणे) यांनी संगणमताने ही चोरी केल्याचे समोर आले आहे.
दि. 26/01/2025 रोजी रात्रौ 11.45 वाजेच्या सुमारास मौजे नेवसेवस्ती खोर, ता. दौंड जि. पुणे येथे ही चोरी झाली. यवत पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासून गुन्ह्याच्या अनुषंगाने माहिती प्राप्त केली. आरोपींना ताब्यात घेण्यासाठी यवत गुन्हे शोध पोलीस पथकाने सापळा रचून वेशांतर करून तीन संशयित इसमांना ताब्यात घेतले.
पोलीस कस्टडी चौकशी दरम्यान आरोपींनी यवत पोलीस स्टेशन हद्दीतील इतर 13 घरफोडी चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली. आरोपींकडून एकूण 14 गुन्ह्यातील 120 ग्रॅम सोन्याचे दागिने, 15 भार चांदीचे दागिने, 30,017 रुपये रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.हि कारवाई मा. श्री. पंकज देशमुख पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मा. श्री. गणेश बिराजदार अपर पोलीस अधिक्षक बारामती, मा. श्री. बापुराव दडस उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड, मा. श्री. अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली केले गेले. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहा. पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज, सपोनि राहूल गावडे (स्था. गु.शा), पो. हवा. संदीपदेवकर, पो.हवा. गुरूनाथ गायकवाड, पो.हवा. अक्षय यादव, पो.हवा. विकास कापरे, पो.हवा. दत्ता काळे, पो.हवा. महेंद्र चांदणे, पो.हवा. रामदास जगताप, सफौ सुभाष शिंदे, सफौ सचिन घाडगे (स्था.गु.शा), पो. हवा. अजित भुजबळ (स्था. गु.शा), पो. हवा. विजय कांचन (स्था.गु.शा), पो.कॉ. धिरज जाधव (स्था.गु.शा), पो.कॉ.मारुती बाराते, पो.कॉ. अमोल भुजबळ, पो. कॉ. मोहन भानवसे यांच्या पथकाने केली
आहे.