पुणे – भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या परिसरातील जबरी चोरी, घरफोडी चोरी व इतर चोरीचे एकूण ११ गुन्ह्यातील विविध स्वरुपाचे सोन्याचे दागिने १५ लाख रुपयांचे २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले होते.हे जप्त केलेले दागिने फिर्यादींना परत करण्यात आले.गेल्या काही महिन्यांमध्ये भारती विद्यापीठ पोलिसांनी जबरी चोरी, घरफोडी, चोरी व इतर चोरीच्या ११ गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याकडून चोरलेले दागिने परत मिळविले होते. न्यायालयाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यानंतर सोमवारी सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांच्या हस्ते ११ फिर्यादींना त्यांचे जप्त केलेले दागिने परत देण्यात आले. चोरीला गेलेले सौभाग्यालंकार परत मिळतील ही आशा सोडून दिली होती. आमच्या दृष्टीने हा लाख मोलाचा दागिना खूप महत्वाचा असतो. भारती विद्यापीठ पोलिसांनी आज ते परत केल्याचे पाहून खूप आनंद होत आहे, असे मनोगत फिर्यादी महिलांनी व्यक्त केले़ दागिने परत मिळाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करीत पोलिसांचे कौतुक केले.ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार उमाकांत ढोले, यास्मीन मणेर, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, सागर बोरगे, बंडु सुतार यांनी केली आहे.