राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक विचित्र घटना घडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यात खराडी भागात मुळा, मूठा नदी पात्रात एका तरुणीचा मृतदेह सापडला होता. यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली.
शिरच्छेद झालेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळला असल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने ही हत्या करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीचे डोकं, हात-पाय धडापासून वेगळे करण्यात आले होते. ही मृत तरुणी 18 ते 20 वयोगटातील असल्याचं सांगितलं जात होतं. आता या प्रकरणाचा तपासातून अत्यंत धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
हत्या का झाली?
झोपडपट्टीतील एका खोलीच्या मालकीच्या वादातून सख्खा भाऊ आणि वहिनीने सकीना खानची हत्या केली आणि घरात धारदार शस्त्राने मृतदेहाचे अनेक तुकडे केले गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलीसांनी सकिनाचा भाऊ अशपाक खान आणि वहिनी हमीदा यांना अटक केली आहे. पुण्यातील पाटील इस्टेट भागतील एका खोलीच्या मालकीतून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. ही खोली सकीनाच्या नावावर होती.
शेजाऱ्यांना आला संशय अन्…
सकीनाचा भाऊ आणि वहिनी तीला घरातून निघून जाण्यास सांगत होते. मात्र ती जात नसल्याने तीची हत्या (Pune Crime News) करण्यात आली आहे. सकीना गावाला गेल्याची खोटी माहिती शेजाऱ्यांना दिली. मात्र शेजाऱ्यांना संशय आल्यावर त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.