राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
बाणेर येथील जमिनीचे बनावट दस्ताऐवज तयार करुन परस्पर विक्री करणार्या पुण्यातील बड्या बांधकाम व्यावसायिकांसह 10 जणांवर गुन्हा दाखल
News | बाणेर येथील कोट्यवधी रुपये किंमतीच्या जमिनीचे बनावट दस्ताऐवज (Fake Documents) तयार करुन नोंदणी कार्यालयामध्ये खरे असल्याचे भासवून जमिनमालकाच्या संमतीशिवाय परस्पर विक्री करुन फसवणुक करणार्या बांधकाम व्यावसायिकासह १० जणांवर चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police Station) गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत जयवंत ज्ञानदेव साळुंखे (वय ५१, रा. वसुंधरा सोसायटी, कात्रज) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अग्रराज डेव्हलपर्सचे (Agraraj Developers Llp) अरविंद जयभगवान गोयल Arvind Jaibhagwan Goyal (वय ४२), अंकुश जयभगवान गोयल Ankush Jaibhagwan Goyal (वय ३९), कपिल सतिशचंद्र अग्रवाल Kapil Satishchandra Agarwal (वय ३३), दाउदयाल किसनलाल सिंघल Dawoodyal Kisanlal Singhal (वय ६६), यश राजेश जैन Yash Rajesh Jain (वय २४), विमलकुमार हरिशकुमार अग्रवाल Vimalkumar Harishkumar Aggarwal (वय ४१), शुभम संजय जैन Shubham Sanjay Jain (वय २८), कुलमुखत्यारधारक राजेश सतपाल जैन (Rajesh Satpal Jain), अमर नामदेव शिंदे Amar Namdev Shinde (रा. इंद्रायणीनगर, भोसरी), सीमा शामराव सबनीस Seema Shamrao Sabnis (रा. शांती सदन, शिवाजीननगर), बापू रोहिदास दळवी Bapu Rohidas Dalvi (वय ४५, रा. कडनगर, उंड्री) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १३ जानेवारी २०२३ ते २ ऑगस्ट २०२४ दरम्यान घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कीर्ती डेव्हलपर्स या लँड डेव्हलपमेंट आणि कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये अॅडमिन मॅनेजर म्हणून काम करतात. या कंपनीचे मालक सी पी मोहनदास यांचे विविध ठिकाणी प्रोजेक्ट चालू आहेत. तसेच मोकळे प्लॉट देखील आहे. कंपनीची बाणेर येथे ६ गुंठे मोकळी जमीन आहे. ही जमीन मुळ मालक सोपाना गणपती मुरकुटे यांच्याकडून कंपनीचे मालक मोहनदास यांची बहिण रतनाबाई टी राधाकृष्णन यांच्या नावे १९९४ रोजी खरेदी केली आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये ही जागा विकायची आहे का याबाबत विचारणा करणारे कॉल येत होते. बाणेर येथील तलाठी कार्यालयामधून या जागेचा सात बारा उतारा काढून पाहिला असता त्यावर डेन्स इन्फ्रास्ट्रक्चर एल एल पी तर्फे अमर नामदेव शिंदे यांच्या नावाची फेरफार होऊन मुळ मालक रत्नाबाई राधाकृष्णन याचे नाव कमी झाले असल्याचे दिसून आले. (Cheating Fraud Case)
ही जागा अमर शिंदे यांच्या नावे खरेदीदस्ताद्वारे हस्तांतरीत झाल्याचे दिसून आले. त्यांच्या नावाची जमीन १ कोटी ७५ लाख रुपयांना विकण्यात आली. हवेली दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदणी झालेल्या खरेदीदस्ताची पाहणी केल्यावर बनावट कुलमुख्यत्यारधारक उभे करुन कट रचून संगनमत करुन खोटे, बनावट दस्ताऐवज तयार करुन ते शासकीय नोंदणी कार्यालयामध्ये खरे आहेत, असे भासवून त्यांची ६ गुंठे मोकळ्या जमिनीची त्यांच्या संमतीशिवाय परस्पर विक्री करुन त्यांची व शासनाची खोट्या बनावट कागदपत्रांद्वारे खरेदीखत करुन फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील (API Narendra Patil) तपास करीत आहेत.