राष्ट्रहित टाईम्स
पुणे प्रतिनिधी
कोयत्याने वार करून तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना बुधवारी (दि. २७) भरदुपारी सव्वाचारच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील खडकवासला जवळील कोल्हेवाडी परिसरात घडली. सतीश सुदाम थोपटे (वय ३८, सध्या रा. सुशीला पार्क, कोल्हेवाडी, खडकवासला; मूळ रा. खानापूर थोपटेवाडी, ता. हवेली) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या हल्ल्यानंतर सर्व हल्लेखोर फरार झाले असून हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे पुढील तपास करीत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, सतीश थोपटे याचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. थोपटेच्या नावावर एकाने फ्लॅट घेण्यासाठी २५ लाख रुपयांचे कर्ज काढले होते. या कर्जाचे हप्ते भरत नसल्याने सतीश हा त्या व्यक्तीला सतत फोन करत होता. त्यातून चिडून सतीश थोपटेचा काटा काढण्याचे कर्ज काढणार्या व्यक्तीने ठरवले आणि बुधवारी (दि. २७) भरदुपारी सव्वाचारच्या सुमारास सुशीला पार्कजवळील कोल्हेवाडी रस्त्यावर थोपटे उभा असताना हातात धारदार कोयते घेऊन आलेल्या चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी थोपटेवर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात थोपटे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
——————–