हडपसर – परीक्षेच्या अभ्यासात असल्याने प्रियकराला काही दिवस भेटणे जमले नाही. फोनवर बोलणे टाळत होत्या. तेव्हा त्याने फोनवर त्याच्याकडील अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असे.रविवारी हा प्रियकर पुण्यात आला, त्याने या तरुणीला शिवीगाळ करुन जबरदस्तीने थार गाडीत बसविले. तिचे अपहरण करुन तिला चाकणच्या दिशेने घेऊन गेला. वाटेत तिला मारहाण करुन जखमी केले. तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हडपसर पोलिसांनी या प्रियकराला अटक केली आहे.प्रज्वल मोहिते असे या प्रियकराचे नाव आहे. याबाबत एका २६ वर्षाच्या तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार रविवारी दुपारी दीड वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मुळच्या नाशिक येथील राहणार्या आहेत. पुण्यात त्या शिक्षणासाठी आल्या़ असून सध्या मांजरी येथे भाड्याने रहात आहेत. त्यांची प्रज्वल मोहिते याच्याशी २०२१ पासून ओळख असून त्यांचे प्रेमसंबंध आहेत. प्रज्वल याचा व्यवसाय आहे. परिक्षा जवळ आल्याने फिर्यादी या अभ्यास करत असतात. त्यामुळे त्यांचे प्रज्वल याच्याशी भेटणे झाले नाही़ तसेच त्यांनी फोनवर बोलणे टाळत होत्या. दरम्यानच्या काळात प्रज्वल याने त्यांना फोनवर त्यांच्याकडे असलेले फिर्यादी यांचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असे. रविवारी तो त्या रहात असलेल्या घरी आला. तिच्याशी भांडण करु लागला. तिचे केस ओढून हाताने मारहाण केली. शिवीगाळ करुन जबरदस्तीने महिन्द्रा थार गाडीत चालकाजवळ बसविले. चालकाला चाकणच्या दिशेने गाडी येण्यास लावली. चालकाच्या शिटजवळ पडलेली तुटलेली टोकदार प्लॅस्टिक पट्टीने त्याने या तरुणीला खांद्यावर, हातावर, मनगटावर, दोन्ही पायांच्या पोटरीवर मांडीवर मारहाण करुन जखमी केले. डोक्यावर बुक्की मारुन जखमी केले. तसेच शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांचे भांडण मिटले. तेव्हा प्रज्वल मोहिते याने तिला चाकण येथील श्वास रुग्णालयात नेऊन तिच्यावर उपचार केले. त्यानंतर रात्री उशिरा पुण्यात आल्यावर या तरुणीने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद घेतली. पोलिसांनी तातडीने प्रज्वल मोहिते याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गेंड तपास करीत आहेत.
