दोन नाईट पँट घेऊन ये. शेतात बोलावलं आणि. ‘त्या’ रात्री काय घडलं?

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे जिल्ह्यातील बेलहे गावातील ही घटना. 5 एप्रिल 2023ची घटना. रात्रीचे 12 वाजले असतील. तेजस तांबेला त्याचे काका पांडुरंग तांबेंचा फोन आला. लवकरात लवकर दोन नाईट पँट आणि दोन टीशर्ट घेऊन शेतात ये, असं पांडुरंगने तेजसला साांगितलं. तेजस कपडे घेऊन पोहोचला. शेतात गेल्यावर तेजसने जे पाहिलं त्याने हादरूनच गेला. पांडुरंग आणि त्याचा एक मित्र महेश कसाळ रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. कपडे घेतल्यानंतर पांडुरंग म्हणाला, मी आज रात्री शेतातच थांबणार आहे. तू घरी जा. त्यामुळे तेजस घरी गेला दुसऱ्या दिवशी गावात राहणारं एक कुटुंब पोलीस ठाण्यात गेलं. किशोर तांबे हरवल्याची तक्रार त्यांनी दाखल केली. किशोर काल संध्याकाळी 7.30 वाजता घरातून शेताकडे जायला निघाला होता. पण परत आलाच नाही, असं या तक्रारीत म्हटलं होतं. किशोर शेतकरी होता. शिवाय तो कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा संचालकही होता. शेतीबरोबरच किशोर मुरूम मातीचाही व्यवसाय करत होता. बांधकामासाठी या मातीचा मोठा उपयोग होतो. त्यातून चांगली मिळकतही मिळते. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी केस दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी किशोरचा शोध घेण्यास सुरुवात केली. इंडियन एक्सप्रेसनुसार, किशोरला ओळखणाऱ्यांची चौकशी करण्यात आली. पण काहीच पत्ता लागला नाही. शेवटी पोलिसांनी दुर्गा नावाच्या कुत्र्याला सोबत घेऊन गाव आणि गावाच्या परिसरातील कोना अन् कोना शोधला.

तेजस बोलला अन्…

किशोरचा शोध घेत दुर्गा पोलीस टीमला घेऊन तांबेवाडी परिसरातील एका पाटाच्या आणि विहिरीच्या जवळ गेली. त्या ठिकाणी पोलिसांनी कसून तपासणी केली. पण हाती काहीच लागलं नाही. त्यामुळे पोलीस माघारी परतले. त्याचवेळी पोलिसांना तेजसवर संशय बळावला आणि त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यामुळे तेजस घाबरला आणि त्याने भडाभडा बोलायला सुरुवात केली. ज्या रात्रीपासून किशोर गायब आहे, त्याच रात्री माझा काका पांडुरंग आणि त्याचा मित्र महेशने रक्ताने माखलेले कपडे घातले होते, असं तेजसने पोलिसांना सांगितलं अन् पोलिसांना खुनाचा उलगडाच झाला.

कारमध्ये रक्तच रक्त

6 एप्रिल रोजी सकाळी काकाने मला त्यांच्या व्हॅगन कारच्या मागचे सीट बदलायला सांगितले होते. ते सीटही रक्ताने माखलेले होते, असं तेजसने सांगितलं. तेजसच्या या कबुलीनंतर पोलिसांनी तात्काळ पांडुरंग आणि महेशला अटक केली. दोघांचीही पोलिसांनी कसून चौकशी केली. आधी त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. आपण काही केलंच नाही, असा आव आणण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांचा खाक्या पडताच त्यांचीही गाळण उडाली. किशोरची हत्या करून त्याचा मृतदेह विहिरीत फेकल्याची कबुली या दोघांनीही दिली.

दुर्गाला आधीच कळलं होतं…

पोलिसांनी मग किशोरचा मृतदेह फेकलेल्या विहिरीकडे प्रयाण केलं. याच विहिरीजवळ आधीच दुर्गा श्वान आलं होतं. पोलिसांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर पोलिसांनी खूनाचं कारण शोधण्यास सुरुवात केली. त्यावेळी मुरूम मातीच्या व्यवसायातून ही हत्या झाल्याचं समोर आलं. पांडुरंग आणि किशोरचं मुरूम मातीच्या व्यवसायावरून भांडण होतं. तर महेशचीही किशोरशी दुश्मनी होती. 2021मध्ये महेशचा एक नातेवाईक सागर कचाळेने आयुष्य संपवलं होतं. सागरच्या मृत्यूला किशोरच जबाबदार असल्याचं महेशला वाटत होतं.

त्या रात्री काय घडलं?

पांडुरंग आणि महेशने किशोरला संपवण्याचा कट रचला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी किशोरला शेतावर दारू प्यायला बोलावलं. तिघांनीही दारू घेतली. किशोर नशेत तर्रर झाल्यावर दोघांनी लोखंडाच्या रॉडने किशोरला बेदम मारहाण केला. त्यात तो मेला. रात्री 9 वाजेच्या सुमारास किशोरची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह विहिरीत फेकण्यास त्यांना दोन तास लागले होते, असं तपासातून उघड झालं आहे. हत्येच्या दोन महिन्यानंतर या प्रकरणी चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. महेश आणि पांडुरंग तुरुंगात आहे. दोघांनीही मुंबई हायकोर्टात जामिनासाठी याचिका दाखल केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags