केडगाव येथील मनोहर कांबळे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल  

Facebook
Twitter
WhatsApp
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क 
 

यवत पोलीस स्टेशन हद्दीत दि. ११ जुलै, २०२४ रोजी केडगाव गावठाण हद्दीत तक्रारदार रोहित चंद्रकांत गजरमल यांच्या फिर्यादीवरुन, मौजे केडगाव येथील जमिन गट नंबर ९३ पैकी ७५ गुंठे क्षेत्र साठेखत करुन देतो, असे सांगून मनोहर हिरामण कांबळे याने २२ लाख रुपये आरटीजीएस मार्फत घेऊन, व्यवहार करण्यास टाळाटाळ करत, विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबतचा गुन्हा ५ सप्टेंबर, २०२४ रोजी यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ८८४/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२), ३१८ (४) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक बी. ए. गाडेकर करत आहेत

गजरमल प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘आरोपी मनोहर कांबळे विरोधात कारवाई करण्यासाठी यवत पोलीस प्रशासनाने दक्षता घ्यावी. सदर प्रकरणात आरोपी मनोहर कांबळे राजकीय दबावतंत्राचा वापर करत आहे. संबंधित तपास अधिकारी तसेच पोलीस बांधवांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, मला मानसिक त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.’

गुन्ह्याकडे गांभिर्याने पाहून पोलीस प्रशासनाने विश्वासघात आणि फसवणुक करणारा आरोपी मनोहर हिरामण कांबळे विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रोहित गजरमल यांनी दौंड विभागाचे पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब घोलप आणि यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांना केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags