नशा करण्यासाठी वापरले जाणारे मेफेनटरमाइन सल्फेट (टर्मिन) इंजेक्शची बेकादेशीरपणे विक्री करणार्‍या दोघांना अटक; 190 बाटल्या जप्त

Facebook
Twitter
WhatsApp

हडपसर – हडपसर परिसरात नशा करण्यासाठी वापरले जाणारे मॅफेनटरमाईन सल्फेट (टर्मिन) इंन्जेक्शनची बेकायदेशीरपणे विक्री करणार्‍या दोघांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.त्यांच्याकडून १ लाख रुपयांच्या मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मिन)च्या १९० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.योगेश सुरेश राऊत (वय २५, रा. घुलेवस्ती, मांजरी, हडपसर) आणि निसार चाँद शेख (वय २३, रा. घाडगे गल्ली, शेख चाळ, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करता असताना विठ्ठलनगरच्या पाठीमागील जिजामाता वसाहतच्या मागील कॅनॉल येथे दोघे जण संशयितरित्या वावरताना मिळून आले. पोलिसांना पाहून ते पळून जाऊ लागले. तेव्हा पोलिसांनी त्यांना पकडले. पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड यांनी त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडील पिशवीत मॅफेनटरमाइन सल्फेट (टर्मिन) या नावाची इन्जेक्शनच्या ६० बाटल्या आढळून आल्या. हे औषध नशा करण्यासाठी प्रति इंजेक्शन ५५० रुपयांना विकत असल्याचे सांगितले. अधिक चौकशीत त्यांच्याकडून एकूण १९० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या दोघांकडे कोणताही औषध विक्री परवाना नसताना हे औषध विक्री करण्याचे कोणतेही शिक्षण घेतलेले नाही. हे औषध केमिकल असून डॉक्टरांच्या सल्लाशिवाय वापरल्यास व व्यक्तीला टोचल्यास त्यातील विषारी द्रव्याचे दुष्परिणाम होऊन औषध घेणार्‍या व्यक्तीच्या आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते, हे माहित असताना सुद्धा नशा करण्यासाठी गैरवापर करण्याच्या उद्देशाने विक्री करण्यासाठी बाळगल्याचे दिसून आले.नागरिकांना अंमली पदार्थ किंवा इतर बेकायदेशीर कृत्यांबाबत माहिती मिळाल्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस उपनिरीक्षक सत्यावान गेंड यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्ता डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दीपक कांबळे, निलेश किरवे, चंद्रकांत रेजितवाड, अजित मदने, अमोल दणके, कुंडलिक केसकर, अमित साखरे, अभिजित राऊत, तुकाराम झुंजार, महावीर लोंढे, महेश चव्हाण बापूर लोणकर यांनी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags