जबरदस्तीने महिलांचे दागिने लुटणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांची पकड — ७.१६ लाखांच्या मालमत्तेची चोरी उघडकीस

Facebook
Twitter
WhatsApp

 

राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क

पुणे, महिलांच्या गळ्यातील दागिने जबरदस्तीने चोरून पळ काढणाऱ्या टोळीविरुद्ध पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ₹७,१६,६१३ किंमतीच्या मालमत्तेची चोरी उघडकीस आणली आहे. जुन्‍नर तालुक्यातील पिंपळगाव सिन्नर रस्त्यावर एका महिलेच्या गळ्यातील ८ तोळे सोन्याचे दागिने आणि मोटार सायकल जबरदस्तीने लंपास करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना अटक केली आहे.       

हि घटना दि.१४/०३/२०२५ रोजी घडली होती.दुचाकीवर आलेल्या दोघा अज्ञात व्यक्तींनी महिला व तिच्या नातेवाईकांना अडवून जबरदस्तीने तिच्या गळ्यातील दागिने खेचून घेतले व मोटार सायकलसह पळ काढला. या घटनेनंतर जुन्नर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे १. अतिन सोननाथ गवळ्याण (वय ३२ वर्षे, रा. गवळ्यवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर)

२. अनिल नारायण गवळ्याण (वय २५ वर्षे, रा. गवळ्यवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर)

तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज, स्थानिक माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला आणि त्यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेले ८ तोळे सोनं व मोटार सायकल हस्तगत करण्यात आली.या आरोपींवर जुन्नर, शिरूर, आळेफाटा आणि राजगुरुनगर पोलिस ठाण्यांत जबरी चोरी व सशस्त्र लुटीचे गुन्हे दाखल आहेत.

 

पोलीस कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी:

पोलिस अधीक्षक श्री. पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलिस अधीक्षक श्री. रमेश सोंडे, उपविभागीय अधिकारी श्री. राकेश दुधवड, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्री. नंदकुमार सवळे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

या कारवाईमुळे महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळाला असून पुणे ग्रामीण पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags