घरफोडी करणाऱ्या दोन गुन्हेगारांना अटक; ४ गुन्ह्यांचा छडा, ४.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Facebook
Twitter
WhatsApp

 

पुणे (दि. १ ऑगस्ट २०२४) – आंबेगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेने दोन आटपाट गुन्हेगारांना अटक करून चार घरफोडी गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत २२ ग्रॅम सोन्याचे दागिने, ४ लॅपटॉप, मोटारसायकल आणि इतर असा एकूण रु. ४,६६,०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

दि. १६ जून २०२४ रोजी सहकारनगर परिसरातील संतोषी माता मंदिर, पिंपळेश्वर कॉलनी येथील घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. या आरोपींची नावे अशी आहेत:

 

१)आयुष अनिकेत खरात (वय २०, रा. सुखसागर नगर, पुणे) २)अर्जुन कैलास आंबोळे (वय १९, रा. गोळेनगर, पुणे)

त्यांच्याकडून चौकशीत पुढील चार गुन्ह्यांचा उलगडा झाला:

 

आंबेगाव पोलीस ठाणे गु.र.नं. ८४/२०२४

 

भारती विद्यापीठ पोलीस ठाणे गु.र.नं. १४९/२०२४ व १६०/२०२४मा

मार्केटयार्ड पोलीस ठाणे गु.र.नं. ६८/२०२४

या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक श्री. हनुमंत माने यांनी केले असून, पोलीस उपायुक्त श्री. अमोल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. शेखर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही यशस्वी कारवाई केली. तपास पथकात पोलीस अंमलदार गणेश जाधव, पो.ह. अनिकेत पवार, हवालदार अनिल ढोले, माने, सुशांत नाईक, नितीन कांबळे, आंबोले यांचा समावेश होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी चोरी केलेल्या वस्तूंमधून काही विक्री केल्याचेही उघड झाले असून, उर्वरित मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. आरोपींच्या विरोधात पुढील तपास सुरु असून, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags