राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
पुणे शहरात गुन्हेगारी उदात्तीकरण करून समाजामध्ये भिती व दहशत पसरविणारे व्हिडीओ रिल्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारीत करणारे इसमांवर पोलीस शाखेकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई कोथरुड पोलीस स्टेशन, पुणे येथे 30 जानेवारी 2025 रोजी झाली.
पुणे शहरातील काही गुन्हेगार व्यक्तींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, विशेषत: इंस्टाग्रामवर, गुन्हेगारी उदात्तीकरण करून व्हिडीओ रिल्स प्रसारीत केले होते. या रिल्समध्ये त्यांनी समाजात भिती व दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला होता. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय कुंभार यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना याबाबत माहीती काढण्यास सांगितले होते.या प्रकरणात अक्षय निवृत्ती शिंदे, सिध्दार्थ विवेकानंद जाधव, साहिल शादुल शेख, आणि इरफान हसन शेख या चार जणांना पोलीस ताब्यात घेतले आहे.फिर्यादी पोलीस अंमलदार प्रशांत शिंदे यांनी कोथरुड पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा रजि. नं. १३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३, ३५३ (१), (ब), सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (२) (३), १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. शैलेश बलकवडे, आणि मा. पोलीस उप आयुक्त श्री. निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली.