कामावरुन काढून टाकलेल्या कर्मचार्‍याने ग्राहकांकडे जाऊन अ‍ॅक्वागार्ड दुरुस्तीच्या नावाखाली घातला गंडा

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे : युरेका फोर्बस कंपनीने कामावरुन काढून टाकले असताना ग्राहकांच्या घरी जाऊन कंपनीचा टेक्नीशियन असल्याचे सांगून नवीन प्लॅन देण्याच्या नावाखाली तीन ग्राहकांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला. गणेश विठ्ठल लंगोटे (रा. गणेशनगर, येरवडा) असे या कर्मचार्‍याचे नाव आहे. याबाबत युरेका फोर्बसच्या जनरल काऊन्सल आनंदिया मजुमदार (वय ४३, रा. रावेत) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २४ जून ते आतापर्यंत घडला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युरेका फोर्बस कंपनी ग्राहकांना अ‍ॅक्वागार्ड हे वॉटर प्युरीफायरची विक्री करते. एका वर्षांमध्ये ग्राहकांना काही प्रॉब्लेम आला तर कंपनी ग्राहकांना सर्व्हिस देऊन त्यांची समस्या सोडविते. त्यासाठी कंपनीने टेक्नीशियन नेमले आहेत. एका वर्षानंतर ग्राहकांना सर्व्हिस घेण्यासाठी अ‍ॅन्युअल मेन्टेनस कॉन्ट्रॅक्ट करावे लागते. गणेश लंगोटे हा कंपनीमध्ये सर्व्हिस टेक्नशियन म्हणून नोकरीला होता. त्याने ८ महिने नोकरी करुन नंतर सोडून दिली. कंपनीच्या युरेका फोर्बस अ‍ॅपवर ऑनलाईन ग्राहक महिलेच्या बोट क्लब येथील घरी गेला. त्यांनी ५ वर्षांपूर्वी अ‍ॅक्वागार्ड घेतले होते. गणेश लंगोटे हा २४ जून २०२४ रोजी त्यांच्या घरी गेला. त्याने तुमचे अ‍ॅक्वागार्ड सुपर कंपनीचे सर्व्हिसिंगचे अ‍ॅन्युअल मेन्टेनन्स कॉन्ट्रॅक्ट संपलेले आहे. रिचार्ज करावा लागेल, वैगेरे सांगून त्यांना प्लॅन दिला. त्यांनी गोल्ड प्लॅन पसंत केला. त्यावर विश्वास बसल्याने त्यांनी ५ हजार ३३२ रुपयांचा गोल्ड प्लॅनचे पैसे त्याच्या मोबाईलवर पेमेंट केले. त्याने अ‍ॅक्वागार्ड मशीनचे फिल्टर बदलले़. तो जाऊ लागला, तेव्हा त्यांनी पेमेंटचे कन्फरमेशनबाबत विचारणा केल्यावर त्याने तुम्हाला ई मेल येईल, असे सांगितले. नंतर तो फोन कट करु लागल्याने त्यांना संशय आला. त्यांनी कंपनीत संपर्क साधल्यावर गणेश लंगोटे याला कामावरुन काढून टाकले आहे, तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार करा असे सांगण्यात आले. अशाच प्रकारे त्याने कोरेगाव पार्कमधील आणखी दोन ग्राहकांना मिळून एकूण १८ हजार ३२ रुपयांची फसवणूक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक शांतमल कोळ्ळुरे तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags