खून केल्या प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर

Facebook
Twitter
WhatsApp

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दि. १४ जून २०२३ रोजी, मारुती मंदिरच्या मागे, रेल्वे क्वॉर्टर लगत,मालधक्का चौक स्टेशन रोड पुणे येथे एका अनोळखी इसमास डोक्यात दगड घालून जीवे ठार मारून, मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा दगडाने ठेचून विद्रूप करुन पुरावा नष्ट केला असल्याने अज्ञात व्यक्ती विरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे येथे भा.द.वि. कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला, पोलिसांच्या तपासादरम्यान आरोपी नामे सूरज लल्ली आगवान याच्याकडे तपास केला असता , पोलीसांना सांगितले की मयत इसम याने माझ्या बायकोला शरीरसुखाची मागणी केल्यामुळे चिडून हत्त्या केली त्यामुळे पोलीसांकडून आरोपीला अटक करण्यात आली होती.

तसेच दि. ०९ सप्टेंबर २०२४ रोजी आरोपी सूरज आगवान यांच्या तर्फे अ‍ॅड राजेश चंदू वाघमारे (Adv Rajesh Chandu Waghmare) यांनी जिल्हा व सत्र न्यायालय पुणे येथे जामीन अर्ज दाखल केला होता, सरकारी वकील यांनी युक्तिवाद केला की, आरोपी हा सी.सी.टी.व्ही मध्ये दिसत आहे , आरोपीच्या बायकोने जबाब दिला आहे की आरोपीने गुन्हा केला आहे, आरोपीच्या विरुद्ध सबळ पुरावा आहे की गुन्हा आरोपीनेच केला आहे त्यामुळे आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला जावा.

तसेच अ‍ॅड राजेश वाघमारे यांनी मे. न्यायालयामध्ये युक्तिवाद केला की, आरोपीचा कोणताही मारण्याचा उद्देश नव्हता, आरोपी विरुद्ध कोणताही थेट पुरावा दिसून येत नाही की आरोपीने गुन्हा केला आहे , आरोपी विरुद्ध त्याच्या बायकोने न्यायबाह्य काबुली जबाब दिलेला आहे तो पुराव्याच्या दृष्टीने ग्राह्य धरला जाऊ शकत नाही त्यामुळे आरोपीचा जामीन अर्ज मंजूर करावा. तसेच अ‍ॅड राजेश वाघमारे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्हि.आर कचरे यांनी आरोपीचा जामीन मंजूर केला. आरोपी हा १ वर्ष ६ महिने येरवडा कारागृह पुणे येथे बंदी होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags