हत्येच्या गुन्ह्यातील चौकशीसाठी तरुणाला बोलवलं, चौकशी दरम्यान पोलिसांकडून जबर मारहाणकुटुंबीयांचा गंभीर आरोप

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे / भोर – न्हावी येथील एका तरुणाने पोलिसांच्या मारहाणीमुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अजय तुकाराम शिंदे (वय-२२, रा.
न्हावी, ता- भोर ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कुटुंबीयांनी शिरवळ पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. अधिकच्या माहितीनुसार, पूर्ववैमनस्यातून शिरवळ एमआयडीसी परिसरात बुधवारी रात्री ११:३० वाजता कंपनीच्या गेटजवळ अमर शांताराम कोंढाळकर (वय-२२, रा. वडवाडी, ता. खंडाळा) याची तलवारीने वार करून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी तेजस महेंद्र निगडे (वय-१९, रा-गुणंद, ता-भोर) याला शिरवळ पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती, त्यानंतर ती कोठडी तीन दिवसांसाठी वाढवण्यात आली. या घटनेचा तपास शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप करीत आहेत.

या हत्येच्या चौकशीदरम्यान, आरोपीसोबत कंपनीत काम करणाऱ्या इतर तरुणांची देखील पोलिसांकडून चौकशी केली जात होती. त्यात अजय तुकाराम शिंदे यालाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. सोमवारी (दि. १७) अजय आपल्या कुटुंबासोबत शिरवळ पोलिस ठाण्यात हजर झाला.

मात्र, पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेत जबर मारहाण केली. मारहाणीनंतर त्याचे हात-पाय सुजले होते. संध्याकाळी सात वाजता त्याला सोडण्यात आले आणि पुढील दिवशी पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आले. दरम्यान मारहाणीच्या भीतीमुळे अजयने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांच्या दबावामुळेच अजयने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags