किरकोळ वादातून पोटच्या 2 चिमुकल्यांची गळा दाबून हत्या; पतीवरही कोयत्याने वार, दौंड मधील धक्कादायक घटना

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे : दौंड तालुक्यातून अतिशय धक्कादायक आणि हादरवणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने चक्क आपल्या पोटच्या दोन चिमुकल्यांचा गळा दाबून हत्या केली. यासोबतच या महिलेने आपल्या पतीवर देखील कोयत्याने वार केले आहेत. शंभू दुर्योधन मिढे (वय-१ वर्ष) आणि पियू दुर्योधन मिढे (वय -३ वर्ष) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.

या महिलेने तिचा पती दुर्योधन आबासाहेब मिढे (वय-३५) याला देखील कोयत्याने मानेवर व हातावर वार करून जखमी केले आहे. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी दौंड पोलिसांनी ३० वर्षीय आरोपी महिलेला अटक केली आहे. पती-पत्नीच्या वादातून आणि सासरच्या जाचाला त्रासून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलण्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आज शनिवार (दि.८) पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार आणि कुरकुंभ चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags