प्रेम संबंधाच्या संशयातून तरुणाला बेदम मारहाण;खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघे अटकेत

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे – प्रेम संबंधाच्या संशयातून तरुणाला दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना सुखसागरनगर परिसरात घडली. यात ऋषीकेश दीपक खोपडे (२६, रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी प्रणव प्रशांत जगताप (२५, रा. बिबवेवाडी), सार्थक संतोष भोर (२१, रा. धनकवडी), कुमार तुळशीराम भागवत (२४) आणि अमर अशोक लोंढे (२०, दाेघे रा. कात्रज) या चौघांना अटक केली.अधिक माहितीनुसार, खोपडे याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपींना होता. रात्री साडेदहाच्या सुमारास खोपडे सुखसागरनर परिसरातून निघाला होता. त्या वेळी आरोपी जगताप, भोर, भागवत, लोंढे यांनी खोपडे याला अडवले.लाथाबुक्क्यांनी, दांडक्याने बेदम मारहाण केली. यात खोपडे गंभीर जखमी झाला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक रऊफ शेख यांनी घटनास्थळी भेट दिली. खोपडे याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेल्या चौघा आरोपींना पोलिसांनी अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक विकास बाबर तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags