राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
पुणे शहरात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालू असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत आरोपी म्हणून स्पा मालक, मॅनेजर, कॅशियर व मॅनेजमेट करणारा एक व्यक्ती ताब्यात घेतला गेला.
घटनेची तपशीलवार माहिती अशी दि. १/०१/२०२५ रोजी गोपनिय बातमीदारामार्फतीने मुरकुटे प्लाझा, औंध, पुणे येथील मसाज स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करिता मुली ठेवुन त्यांना पुरुष ग्राहकांना मसाजच्या नावाखाली पुरवुन त्यांचेकडुन वेश्याव्यवसाय करवुन घेत असलेबाबत खात्रीशिर बातमी प्राप्त झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अजय वाघमारे यांनी आदेशीत केल्याने बनावट ग्राहक पाठवुन खात्री करुन छापा टाकला.
आरोपी रिकबुल हुसेन आबुल हुसेन (वय २६ वर्षे) यास ताब्यात घेतले व त्यांचे ताब्यातील ०९ महिला (४ महाराष्ट्र, १ गुजरात, ४ थायलंड) सुटका केली. या महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले गेले होते.
आरोपींविरुध्द चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं.६७/२०२५ अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १४३,३ (५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईत मा.पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे २, श्री राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ४, चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.अजय वाघमारे, व चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री विजयानंद पाटील यांचे सुचनेप्रमाणे सहा.पोलीस निरीक्षक, नरेंद्र पाटील, पोलीस उप निरीक्षक, वैभव मगदुम व गुन्हे शाखा युनिट४, पथक व चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनकडील स्टाफने कारवाई केली आहे.