राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
पुणे : पूजा खेडकर प्रकरणात सातत्याने अपडेट समोर येत आहेत. मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून जमीन लाटण्याचा प्रयत्न आणि बंदुकीच्या सहाय्याने दिलेली जीवे मारण्याची धमकी यामुळे पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर अडचणीत सापडल्या आहेत.दरम्यान मनोरमा खेडकर प्रकरणात आणखी काही तपास करायचा असल्याने पोलिसांनी कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी पोलिसांनी केली होती. यासंदर्भात मनोरमा खेडकरांना आज कोर्टात नेण्यात आलं, यावेळी कोर्टासमोर आपल्यावर तुरूंगात कसा अन्याय होत आहे, ते सांगितलं.
नेमकं कोर्टात काय घडलं?
पौडच्या न्यायलयात बोलताना मनोरमा खेडकरांनी तुरूंग प्रशासनावर गंभीर आरोप केले, त्या म्हणाला, “कोर्टात मला चहा, जेवण वेळेवर दिलं जात नाही. सकाळचा चहा 9 वाजता मिळतो तर जेवण उशिरा दीड वाजता मिळते. त्याचबरोबर मला झोपायला दिलेली खोली देखील ओली आहे” असं मनोरमा खेडकर यांनी म्हटलं आहे. आता मनोरमा खेडकरांनी केलेल्या या आरोपांसंदर्भात पौडचे कोर्ट पुढील सुनावणीच्या वेळी सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहे.
सरकारी वकिलांचा युक्तीवाद:
मनोरमा खेडकर यांची आणखी २ दिवसांची पोलीस कोठडी मागितली गेली. मुळशी ज्या जागी गुन्हा घडला त्या ठिकाणी असणारे कंटेनर कोणाचे होते याचा तपास करायचा आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे. तसेच मनोरमा खेडकर आणि या प्रकरणात अटकेत असणारे आणखी दोन आरोपी तपासात कोणत्याही प्रकारचं सहकार्य करत नाहीत असा आरोप देखील पोलिसांनी केला आहे.
मनोरमा खेडकरांच्या वकिलांची बाजू:
या प्रकरणांमध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे कलम 307 लागू होत नाही.ते कलम काढून टाकावे. उर्वरित कलमे जमीनपात्र आहेत. त्यामुळे पोलीस कोठडी वाढवण्यात येऊ नये अशी बाजू आरोपीच्या वकिलांनी मांडली. दरम्यान कोर्टाने यावर निर्णय दिला आहे. मनोरमा खेडकरांच्या पोलीस कोठडीच दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तर पुढील सुनावणीच्या वेळी मनोरमा यांच्या आरोपांसदर्भातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे.