राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
परभणी येथे दि.१० डिसेंबर रोजी संविधान शिल्प विटंबना करण्यात आली होती.व विटंबना प्रकरणाचा निषेध करीत रिपब्लिकन सेनेचे वतीने लोणी कंद पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले. संविधान शिल्पाची विटंबना झाल्यानंतर संविधान समर्थक व भीमसैनिक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत होते.या आंदोलन कर्त्यांवर पोलीस प्रशासनाकडून लाठीचार्ज करण्यात आला.
तसेच कोंबिंगऑपरेशन करून लॉकअप मध्ये टाकण्यात आले.यामध्ये एल.एल.बी.करणारा सोमनाथ सूर्यवंशी नावाचा उच्चशिक्षित युवकाला अटक करण्यात आले.व अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली.या मारहाणीमुळे या तरुणाचा मृत्यू झालेला आहे
या घटनेचा निषेध करुन संबंधित पोलिस कर्मचारी व अधिकारी यांना निलंबित करुन मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी ही मागणी या प्रसंगी करण्यात आली.अशा आशयाचे निवेदन लोणी कंद पोलीस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक गोडसे यांना देण्यात आले.तसेच या निवेदनाची प्रत महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, महाराष्ट्र राज्य राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, यांना स्पीड पोस्ट द्वारे पाठवण्यात आले आहे.निवेदनावर तात्काळ कारवाई करण्यात आली नाही तर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे .
या प्रसंगी रिपब्लिकन सेनेचे कुमार भाऊ नितनवरे, बहुजन दलित महासंघ अध्यक्ष आनंद वैराट,बनेश नितनवरे, अमोल नितनवरे, अशोक गायकवाड जीवन नितनवरे ,सागर निकाळजे ,संजय नितनवरे, अविनाश कांबळे, किरण नितनवरे, गणेश घुमे,किसन लोखंडे, तुकाराम गायकवाड, बाळराजे गायकवाड,प्रमोद घुमे, महेश घुमे, प्रमोद शिर्के, सोमनाथ खंडागळे, दत्ता मुंडे,अक्षय शिंदे,उमेश लांडगे व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.