पुणे : वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन करून पहाडी पोपट (अलेक्झान्ड्रीन पॅराकिट) या वन्यजीव पक्ष्यांची खरेदी-विक्री करण्याच्या प्रकरणात सीमा शुल्क विभाग आणि वन विभागाने संयुक्तपणे कारवाई करून दोघे आरोपी अटकेत आणले आहेत.
पुणे रेल्वे स्थानक परिसरात अवैधरीत्या पहाडी पोपटांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार होणार असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सीमा शुल्क विभागाच्या मदतीने केलेल्या कारवाईत शेख सरफराज शेख खदीर व सचिन सुजित रोजोरिया या दोघा आरोपींना अटक करण्यात आली.
शेख सरफराज शेख खदीर याला पुणे रेल्वे स्थानक परिसरात ताब्यात घेतले गेले. चौकशीअंती तो वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ च्या कलम २, ३९, ४८ (अ), ४९, ५० व ५१ अंतर्गत दोषी आढळल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. तपासादरम्यान सचिन सुजित रोजोरिया याचे नाव पुढे आले, व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी पुण्यातील सांगवी फाट्यावर त्याला सापळा रचून ताब्यात घेतले गेले.
दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना २१ फेब्रुवारी २०२५ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपींना येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
ही कारवाई सहायक वनसंरक्षक मंगेश ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत वनपरिमंडळ अधिकारी वैभव बाबर, प्रमोद रासकर, वनरक्षक काळुराम कड, अनिल राठोड, मधुकर गोडगे, ओंकार गुंड, विनायक ताठे, रमेश शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
नागरिकांना आवाहन
वन्यजीव तस्करी किंवा बेकायदेशीर वृत्तींविषयी माहिती असल्यास नागरिकांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन सहायक वनसंरक्षक मंगेश ताटे यांनी केले आहे.
सचिन सुजित रोजोरिया या दोघा आरोपींना अटक करण्यात आली.