“पुणेकरांच्या नादाला लागू नका” कारच्या मागे ठेवलं असं काही की लोक घाबरून रस्त्यातच मारु लागले ब्रेक

Facebook
Twitter
WhatsApp

पुणेकरांच्या नादाला लागू नये असे म्हणतात ते उगाच नाही. पुणेकर कधीही इतरांची आरेरावी सहन करून घेत नाही, स्पष्ट शब्दात बोलतात आणि समोरच्याला त्याची चूक दाखवून देतात. पुणेकरांना त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाते.मोजक्या शब्दात ते समोरच्याला त्याची चूक दाखवण्याचे कौशल्य अस्सल पुणेकरांकडे हमखास असते. अनेकदा बेशिस्त नागरिकांना शिस्त लावण्यासाठी पुणेकर त्यांची पुणेरी शैली वापरताना दिसतात. बेशिस्त लोकांना टोला लगावणाऱ्या अनेक पाट्या पुण्यात पाहायला मिळतात. पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात.

पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. दरम्यान अशाच एका पुणेकरानं आपल्या गाडीच्या मागच्या सीटवर असं काही ठेवलं की मागून येणारे सर्व चालक घाबरू लागले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पहिल्यांदा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही घाबरुन जाल. तर नंतर मात्र डोक्याला हात लावून हसाल.

आता तुम्ही म्हणाल या कार मालकानं गाडीच्या मागे असं ठेवलंय तरी काय? तर या कार मालकानं आपल्या कारच्या मागच्या सीटच्यावर एका व्यक्तीचा पुतळा ठेवला आहे. हा पुतळा एका वृद्ध व्यक्तीचा आहे, जो खूप भितीदायक दिसत आहे. हे पाहून मागून येणारे सर्वच वाहनचालक घाबरत आहेत. तर कुणी अचानक पाहून गाडी थांबवत आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून लोक पुणे तिथे काय उणे अशा प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल एवढं नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags