राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
पुणे शहरातील सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी 31 जानेवारी 2025 रोजी सराईत वाहन चोरी करणार्या दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले सोपान रमेश तोंडे (वय 27 वर्ष) व आकाश सुनिल नाकाडे (वय 29 वर्ष) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.
ही घटना सिंहगड रोड येथे घडली.वाहनचोरी बाबत पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार मा.पोलीस उपआयुक्त परिमंडळ ३ पुणे शहर श्री. संभाजी कदम यांचे मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेत होते. आरोपींकडून 05 मोटारसायकली, 02 घरफोडीच्या गुन्हयातील दोन लॅपटॉप व एक कॅमेरा जप्त करण्यात आले.
सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक श्री. संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार, संजय शिंदे, उत्तम तारु, आण्णा केकाण, देवा चव्हाण, सागर शेडगे, विकास बांदल, अमोल पाटील, विकास पांडुळे, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, स्वप्नील मगर, विनायक मोहिते यांचे पथकाने या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आरोपींनी कृष्णा रेसिडेन्सी सिध्दी लॉन्स समोर, वेताळबुवा चौक नहेगाव पुणे येथुन होन्डा ॲक्टीव्हा मोपेड चोरी केल्याचे सांगितले.
आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि सचिन निकम सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.