सरपंच बारवकर यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल पण दौंड पोलीस प्रशासनाची टाळाटाळ

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क

यवत पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक २२ जुलै, २०२४ रोजी नवनाथ साहेबराव मोरे, वय-४७ वर्षे, व्यवसाय-किराणा दुकान, जातीने महार आणि अपंग असून, देऊळगावगाडा, ता. दौंड, जि. पुणे यांनी सरपंचासह चौघांवर जातीवाचक शिवीगाळ, सामूहिक अपमान आणि धमकी प्रकरणी, भारतीय दंड संहिता कायद्यानुसार ५०४, ५०६, ३४, अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधात्मक कायद्यानुसार ३ (१-r), ३ (१-s), अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियमानुसार ९२-a प्रमाणे यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.* 

*सदर मोरे हे देऊळगावगाडा गावात किराणा मालाचे दुकान चालवून त्यावरती कुटूंबाची उपजिविका करतात. मौजे देऊळगावगाडा गावामधील ग्रामस्थांचा ‘ग्रामपंचायत देऊळगावगाडा’ या नावाचा व्हाॅटसअप ग्रुप असून नवनाथ मोरे ग्रुपमध्ये सदस्य आहेत. देऊळगावगाडा गावच्या विद्यमान सरपंच विजया सोमनाथ बारवकर आहेत.*

*दिनांक २४ जून, २०२४ रोजी देऊळगावगाडा, ता. दौंड, जि. पुणे गावची ग्रामपंचायतची मासिक सभा असल्याने नवनाथ मोरे यांनी अपंग असल्याने व्हिलचेअरची मागणी करणेसाठी, ग्रामपंचायत मासिक सभेमध्ये गेले असता, सदर ठिकाणी ग्रामपंचायत देऊळगावगाडा गावचे विद्यमान सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य मासिक सभेसाठी उपस्थित होते. व्हिलचेअरची मागणी केल्यामुळे उपस्थित ग्रामपंचायत सदस्य यांनी संमती दिली. परंतु, सरपंच विजया बारवकर आणि त्यांचे पती सोमनाथ बारवकर यांनी व्हिलचेअर देण्यास नकार दिला.*

*काही वेळानंतर सरपंच विजया बारवकर व त्यांचे पती सोमनाथ बारवकर हे त्यांच्या घराकडे जाताना नवनाथ मोरे यांच्या दुकानासमोर येऊन म्हणाले की, “तुमची मांगा महारांची लायकी नाही ग्रामपंचायतमध्ये येण्याची व निर्लज्यासारखी काही मागणी करण्याची” असे म्हणून शिवीगाळ करुन जातीविषयी बोलून, अपमान करुन निघून गेले.*

*दुसरे दिवशी दि. २५ जून, २०२४ रोजी दुपारी १२ वाजून ४९ वाजता ग्रामपंचायत देऊळगावगाडा व्हाॅटसअप ग्रुपवरती सोमनाथ बारवकर याने मेसेज केला की, “ज्याला चार वर्षाचा ग्रामपंचायत कर भरता येत नाही, त्यांनी आमचे विषयी व ग्रामपंचायत विषयी बोलणे किती निर्लज्जपणा आहे, यावरुन त्यांची लायकी काय आहे, हे सर्वांना कळले असेल. ज्याची लायकी नाही त्यांना आम्हांला उत्तर द्यायची वेळ आली आहे. परंतु, गप्प बसल्यानंतर काळ सोकवतो म्हणून त्यांना उत्तर देणे गरजेचे आहे. मेसेज टाकताना ५% निधी विषय व ग्रामपंचायत कामकाजाविषयी माहिती घेतली असती तर आपली लायकी काढायची वेळ आली नसती. तू ग्रामपंचायतमध्ये तेवढ्यासाठीच आलता काय.? काल का फुकटची खुर्ची मिळायासाठी आलतास. तुला माहिती देणारा आणि तू एका चांगल्या डोक्याच्या तज्ञ डाॅक्टरकडे जाऊन तपासणी करुन घे, म्हणजे असे चुकीचे मेसेज टाकणार नाहीस.”*

*असा मेसेज केल्यावर विजया सोमनाथ बारवकर, सोमनाथ शिवाजी बारवकर, जालिंदर सखाराम बारवकर, ज्ञानेश्वर आबासाहेब वाघापुरे यांनी सदर मेसेजचे समर्थनात लाईक करुन नवनाथ मोरे यांच्या भावना दुखावतील असे कृत्य केले.*

*माझ्याविरोधात पोलीसात तक्रार दिली तर, माझ्या पत्नीच्या साहाय्याने तुला मदत करणाऱ्या ग्रामस्थांवरती तक्रार करील, अशी धमकीदेखील सोमनाथ बारवकर यांनी दिली आहे.*

*एफआयआर प्रमाणे गुन्हे दाखल होऊन ८ दिवस झाले तरी आरोपींवर कोणतीही कारवाई न करता अटक करण्यात आलेली नाही. सदर प्रकरणी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्याशी राष्ट्रहित टाईम्स प्रतिनिधीने संपर्क साधला असता म्हणाले की, “सदर ॲट्रॉसिटीचा तपास हा दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी घोलप साहेबांकडे आहे.*

*नवनाथ मोरे यांनी सदर आरोपींना तात्काळ अटक करुन, सदर प्रकरणाची दखल घेऊन मला दौंड उपविभागीय अधिकारी घोलप साहेबांनी न्याय द्यावा अशी मागणी लेखी अर्जाद्वारे oकेली आहे.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags