राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
पुणे ग्रामीण पोलीस कार्यालयात दिनांक ०२/०२/२०२५ रोजी एक चोरी गुन्ह्याची फिर्याद दाखल करण्यात आली, ज्यामध्ये एका तरुणीचा मोबाईल चाकुचा धाक दाखवून चोरला गेला होता. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने त्वरित कारवाई करत तीन अनओळखी चोरट्यांना ताब्यात घेतले आहे.
दिनांक ०२/०२/२०२५ रोजी रात्री २१.०० वाजेच्या सुमारास, फिर्यादी पायल संतोष लोहार वय १९ वर्षे, ज्या सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे येथे राहतात, त्या त्यांचे वडीलांचा डब्बा घेवुन पायोनेर प्रा. लिमीटेड कंपनी कडे आहिल्यानगर ते पुणे हायवे रोडने पायी जात असताना, शिक्रापुर गावचे हददीत हॉटेल भाऊचा धक्का येथे त्यांच्या पाठीमागुन २० ते २१ वर्षे वयाचा एक अनओळखी मुलगा आला व त्याने फिर्यादी यांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावुन घेत असताना फिर्यादी यांनी त्यास विरोध केल्याने त्या अनओळखी इसमाने फिर्यादी यांना चाकुचा धाक दाखवुन फिर्यादी यांचा मोबाईल जबरदस्तीने काढुन घेवुन पळुन जात असताना पाठीमागुन आलेल्या स्प्लेन्डर मोटारसायकल वरील दोन अनोळखी इसमां बरोबर पळुन गेलेला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तंत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज व गोपनिय बातमीदार यांचे मदतीने आरोपींचा शोध घेतला. या तपासातून आरोपी नामे १) गणेश कैलास भोसले वय १८ वर्षे रा.मावळेवाडी ता. पारनेर जि. आहिल्यानगर व २) अजय माणिक घेगडे रा. राजापुर ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर यांना ओळखले गेले.
आरोपी अ.नं. १ याचेकडे केलेल्या तपासामध्ये निष्णात झालेले आहे त्यामुळे आरोपी नं. १ व त्यांचे सहकारी अ.न. २ व ३ यांनी गुन्हयात वापरलेली मोटारसायकल ही पुणे शहर पोलीस आयुक्तालयामधील खराडी पोलीस स्टेशनच्या हददीमधुन चोरी केलेली असल्याचे त्याचेकडे केलेल्या तपासात निष्णात झले आहे. सदर आरोपी याचेकडुन गुन्हयात चोरी गेलेला ५०००/- रुपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट व गुन्हा करताना वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आलेली आहे.सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे साो. पुणे विभाग, श्री. प्रशांत ढोले उपविभागीय पोलीस अधिकारी शिरुर उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिक्रापुर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजू मोमीन, मंगेश थिगळे, सागर धुमाळ यांनी केली असून पुढील तपास शिक्रापुर पोलीस स्टेशनचे डी.बी.पथक करीत आहे.