पुणे : पाषाणमधील कोकाटे गल्ली येथे पुतण्याने काकाचा तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करुन खुन केल्याचा प्रकार शनिवारी समोर आला आहे. महेश जयसिंग तुपे (वय ५८) असे खुन झालेल्या काकाचे नाव आहे. तर, शुभम महेंद्र तुपे असे पुतण्याचे नाव आहे. ही घटना पाषाणमधील कोकाटे गल्ली शनिवारी सकाळी साडेसहा वाजता घडली.
महेश तुपे हे बँकेतील मुदत ठेवीचे पैसे देत नसल्यावरुन त्यांच्यात वाद होता. आज सकाळीही त्यांच्यात त्याच कारणावरुन वाद झाला. वादावादीत शुभम याने त्याच्याकडील तीक्ष्ण हत्याराने महेश तुपे यांच्यावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात महेश तुपे हे पडल्यानंतर शुभम तुपे तेथून पळून गेला. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव , वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील व इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनेची माहिती घेतली असून आरोपीचा शोध सुरु आहे.