मसाज पार्लरच्या नावाखाली चालत होता वेश्याव्यवसाय खराडी मधील प्रकार.

Facebook
Twitter
WhatsApp
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क

पुणे प्रतिनिधी

मसाज पार्लरच्या  नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु करणार्‍या स्पावर पोलिसांनी छापा टाकून दोन तरुणींची सुटका केली. व्हाईट स्टोन स्पा या मसाज पार्लरमधील व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे.

लोकेश राजकुमार पुरी  (वय २३, रा. चौधरी वस्ती, खराडी) असे या व्यवस्थापकाचे नाव आहे. याबाबत अनैतिक वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाच्या (AHTU Pune) सहायक फौजदार छाया शहाजी जाधव यांनी खराडी पोलीस ठाण्यात (Kharadi Police Station) फिर्याद दिली आहे. ही कारवाई खराडी येथील राजाराम पाटीलनगर येथील फॉरच्युन प्लाझा बिल्डिंगमधील व्हाईट स्टोन स्पावर सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता करण्यात आली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीतील राजाराम पाटीलनगर येथील फॉरच्युन प्लाझा बिल्डिंगमध्ये व्हाईट स्टोन स्पा आहे. याठिकाणी मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्षाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक तेथे पाठविण्यात आले. ग्राहकाने खात्री करुन पोलिसांना मिस कॉल देऊन इशारा केला. त्यानंतर पोलिसांनी छापा घालून वेश्या व्यवसाय करवुन घेत असलेल्या दोन तरुणींना ताब्यात घेतले. व्यवस्थापक लोकेश पुरी याला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण (PI Sanjay Chavan) तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags