वयोवृध्द महिलेच्या गळयातील सोनसाखळी चोरणारा आरोपी चार तासात जेरबंद.

Facebook
Twitter
WhatsApp

 

राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
डेक्कन पोलीस स्टेशन हद्दीत दि. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी एक वयोवृध्द महिलेच्या गळयातील सोनसाखळी चोरण्याची घटना घडली. या घटनेत आरोपी अक्षय अनिरुद्ध ओक (वय २७ वर्ष) ला पोलिसांनी चार तासातच ताब्यात घेतले.
आरोपीने लीफ्ट देण्याच्या बहाण्याने वयोवृध्द महिलेला नदीपात्र वीटभट्टी जवळ नेऊन मारहाण करण्याची धमकी दिली व जबरदस्तीने तिच्या गळयातील सोनसाखळी हिसकावून घेतली. या घटनेनंतर तात्काळ तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदारांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून तांत्रिक विश्लेषण व गोपनिय बातमीदारांमार्फत माहिती प्राप्त केली.
डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ३६/२०२४, भा.न्या. सं. कलम ३०९ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीचे नाव व पत्ता मिळाल्यानंतर त्यास ताब्यात घेवुन पुढील तपासकामी डेक्कन पोलीस ठाणे येथे आणुन त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने आपले नाव अक्षय अनिरुद्ध ओक वय २७ वर्षे असल्याचे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले, दत्तात्रय सावंत, सहा. पोलीस फौजदार दत्तात्रय शिंदे, महिला पोलीस अंमलदार धनश्री सुपेकर, पोलीस अंमलदार महेश शिरसाठ सागर घाडगे, वसीम सिद्दीकी, रोहित पाथरुट, रोहित मिरजे, नागनाथ म्हस्के यांनी पुढील अधिक तपास केला.
आरोपीकडुन १,००,०००/रू. किं.ची एक सोनसाखळी व २०,०००/ रु. कि.ची दुचाकी असा एकुण १,२०,०००/ रु. मुद्येमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags