ज्योतीश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनात ज्येष्ठ ज्योतिषांचा सत्कार

Facebook
Twitter
WhatsApp

 

श्री ज्योतिष संशोधन केंद्र (जळगाव )तर्फे आयोजित अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, ९ जून रोजी या क्षेत्रातील ज्येष्ठ मान्यवरांचा त्यांच्या दीर्घ योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.ज्योतीश्री जीवन गौरव पुरस्कार देवुन ज्योतिर्विद मोहन दाते(सोलापूर),ज्योतिर्विद सुनिल घैसास( मुंबई ) यांना गौरविण्यात आले. ज्योतीश्री पुरस्कार देवून ज्योतिर्विद डॉ. अविनाश कुलकर्णी(जळगाव), ज्योतिर्विद मोरेश्वर मराठे(मुंबई) यांना गौरविण्यात आले.श्री ज्योतिष संशोधन केंद्र(जळगाव),अभिजीत प्रतिष्ठान-द इन्स्टिट्यूट ऑफ डेस्टिनी मॅनेजमेंट(मुंबई),द लीला टॅरो(पुणे) या संस्थांनी द प्रेसिडेंट हॉटेल(प्रभात रस्ता,पुणे) च्या सभागृहात या अधिवेशनाचे आयोजन केले होते.

 

अधिवेशनाचे हे चौथे वर्ष होते. या अधिवेशनामध्ये दोन दिवस ज्योतिषविषयक अनेक सत्रे पार पडली. मान्यवरांच्या व्याख्यानासह विविध पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले.अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातून ज्योतिषप्रेमी व मान्यवर उपस्थित होते. दि.८ आणि ९ रोजी ज्योतिषविषयक विविध विषयांवर व्याख्याने आणि मार्गदर्शन आयोजित करण्यात आले.

 

 

९ जून रोजी दुपारी झालेल्या सन्मान सोहळ्यात ज्योतिर्विद सुनिल पुरोहित,ॲड. सौ. सुनिता पागे, कांतीलाल मुनोत, विजयकुमार वाणी, विलास बाफना, एकनाथ मुंढे, सौ. स्मिता गिरी, सौ. सविता महाडिक, सौ. शुभांगीनी पांगारकर,सौ. संजीवनी मुळे उपस्थित होते.ज्योतिर्विद श्री. राहुल कोठेकर यांनी मानपत्र वाचन केले.विद्यार्थी गुणगौरव सोहळा देखील यानंतर सायंकाळी पार पडला. ज्योतिर्विद चंद्रकांत शेवाळे, विजय जकातदार,नंदकिशोर जकातदार, कैलास केंजळे,सौ.चंद्रकला जोशी, सौ.जयश्री बेलसरे, गुरूश्री प्रिया मालवणकर, श्रीमती चित्रा दीक्षित,सौ.आरती घाटपांडे, सौ. पल्लवी चव्हाण,सौ.सीमा देशमुख उपस्थित होते.

 

शैलेश पुरोहित, सौ. तृप्ती भोसले, डॉ. शुभदा पांगरीकर, सौ.अपर्णा गोरेगावकर यांनी विविध सत्रांचे सूत्रसंचलन केले.ज्योतिर्विद सौ. निलिमा बाऊस्कर,सौ. स्वाती काकुळते, नाशिक यांनी विविध सत्रांचे आभार प्रदर्शन केले.सायंकाळी श्री ज्योतिष संशोधन केंद्राच्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याने अधिवेशनाचा समारोप झाला.

———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags