‘रस्त्यावर वाढदिवस, धांगडधिंगा चालणार नाही’, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा स्पष्ट इशारा

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे – शहरात मागील काही दिवसांपासून रात्री १२ वाजता रस्त्यावर येऊन वाढदिवस साजरा करण्याची पद्धत जोर धरू लागली आहे. रात्री १२ वाजता एखाद्याचा वाढदिवस असेल तर मोठ्या प्रमाणावर टोळक्यांकडून फटाके फोडून, मोठ्याने साउंड लावून धिंगाणा घालत वाढदिवस साजरा होत असल्याचे आढळून येत आहे दरम्यान आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशी कृत्ये करणाऱ्यांना सज्जड दम देत स्पष्ट इशारा दिला आहे.कोंढवा पोलीस ठाणे आणि मरकजी बैतूल माल फाऊंडेशन आयोजित एका कार्यक्रमात अमितेश कुमार बोलत होते. रस्त्यावर वाढदिवस साजरा करून धांगड धिंगाणा अजिबात चालणार नाही. लपून छपून कोणी हे कृत्य करून लपून बसत असेल तर ठीके पण ज्यादिवशी तो व्यक्ती पकडला जाईल तर त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना जबाबदारी घ्यावी लागेल, अशा स्पष्ट सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या आहेत.पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘ रस्त्यावर वाढदिवस साजरा करून धांगड धिंगाणा अजिबात चालणार नाही. आई वडिलांवर आपल्या मुलांवर नियंत्रण लावण्याची जबाबदारी आहे. आई वडिलांचे ऐकत नसतील तर आमची मदत घ्या, त्याचे मन परिवर्तन आम्ही करू, ते कसं करायचं याची पद्धत आम्हाला येते. जर तुम्ही नागरिकांनी सुद्धा जबाबदारी घेतली तर रस्त्यावर कुठला ही दादा जन्माला येणार नाही.सध्या अनेकजणं वाढदिवसाच्या निमित्ताने रस्त्यावर केक कापताना दिसत आहेत. नुकतीच एक घटना कोंढव्यातील पारघेनगर मध्ये घडली. परंतु त्यातील तो व्यक्ती पळून गेला, जेव्हा सापडेल तेव्हा त्याचा प्रत्येक वाढदिवस पोलीस ठाण्यात साजरा होईल आणि तिथेच त्याचा केक कापला जाईल’, अशी ग्वाही पोलीस आयुक्तांनी यावेळी बोलताना दिली.शहरातील अवैध धंद्यांबाबत बोलताना ते पुढे म्हणाले, पुणे शहरात अवैध धंद्यांना हद्दपार करू या गोष्टीला अजून पूर्णपणे यश आलेले नाही. अवैध धंदे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहेत अशी कुठलीही शंका मनामध्ये ठेऊ नका. असे धंदे करणाऱ्या लोकांना पोलिसांकडून ताकीद आहे की ज्या दिवशी आमच्या तावडीत सापडाल तेव्हा तुम्हाला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागेल.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags