राष्ट्रहित टाईम्स श राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
उरुळी कांचन
साने संगीत लोककला मंच वार्षिक स्नेहसंमेलन २०२४ उरुळी कांचन येथे उत्साहात पार पडले. सम्राट बहुउद्देशीय जनजागृती सेवाभावी संस्थेच्या अंतर्गत साने संगीत लोक कला मंच यांच्यावतीने हे स्नेहसंमेलन घेण्यात आले होते. विद्यार्थी पालक यांचा या स्नेहसंमेलना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली.सुरवातीला विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.या कार्यक्रम प्रसंगी पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यामध्ये दैनिक लोकमत सहदेव खंडागळे, दैनिक सकाळ सुवर्णा कांचंण, दैनिक सामना भाऊसाहेब महाडिक, राष्ट्रहित टाईम्स आनंद वैराट सुनिल तुपे, सुरेश वाडेकर, संतोष वाघमारे ,प्रकाश मस्के, सिद्धार्थ ढाले, अनिल गायकवाड ,शिवाजी पारेकर ,सदाशिव कांबळे, इत्यादी पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब पाटोळे सुभेदार मेजर निवृत्ती आर्मी हे होते.तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा.सतीश बाबुराव रावजादे,(चित्रपट अभिनेते), साजित मुलानी ( चित्रपट दिग्दर्शक) विजय तुपे (पुणे जिल्हा अध्यक्ष चित्रपट, कला साहित्य, सांस्कृतिक विभाग) हवेली पंचायत समितीच्या माजी उपसभापती हेमलताताई बडेकर, माजी शिक्षणाधिकारी प्रभाकर खरात , मा.सरपंच उरुळी कांचन अमित भाऊ कांचन ,श्री रवींद्र भोळे साहेब,अरुण खरात, भीमराव घायवण सुरवसे साहेब शिंदे साहेब दत्ता सोळुंके विकास साने आदी मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या विक्रमाचे आयोजन संस्थेचे प्रमुख रेखा साने व शिवराज साने या दांपत्याने केले होते. सुत्रसंचालन सहदेव खंडागळे यांनी केले तर आभार अमोल भोसले यांनी मानले.