विधानसभेमध्ये ही पाटलांचीच हवा.

Facebook
Twitter
WhatsApp

 

 

राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल एकदाचा लागला आहे. महायुतीने प्रचंड बहुमतासह सत्ता कायम राखली असून, महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला आहे. मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री कुणीही झाले तरी विधानसभेत पाटील मंडळींचेच वर्चस्व राहणार आहे. मतदारांनी यंदा पाटील आडनावाच्या 25 जणांना विधानसभेत पाठवले आहे. विशेष म्हणजे, या पाटील आडनावांच्या यादीत काँग्रेसचा एकही आमदार नाही.

गेल्या पाच वर्षांतील राजकीय घडामोडी पाहता विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ती उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली होती. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला मतदारांनी धक्का दिला होता. सर्व प्रकारची शक्ती सत्ताधारी महायुतीकडे केंद्रित झालेली असतानाही त्यांना केवळ 17 मतदारसंघांत विजय मिळाला होता. याउलट, पक्षफुटीचा सामना करणाऱ्या महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या मिळाल्या होत्या. त्यामुळे महायुतीचे धाबे दणाणले होते.

 

लोकसभा निवडणुकीत (loksabha Election) धक्का बसल्यामुळे सत्ताधारी महायुतीचे नेते जागे झाले आणि लाडकी बहीण ही महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये टाकणारी योजना लागू करण्यात आली. त्याचा महायुतीला फायदा झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. महायुतीला 230 जागा मिळाल्या. त्यात भाजपला 132, शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादीला मिळालेल्या 41 जागांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 30 जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत 288 पैकी केवळ 46 जागा मिळाल्या. या सर्व पक्षांचे मिळून पाटील आडनावाचे एकूण 25 आमदार निवडून आले आहेत.

विधानसभेतील भाजपचे पाटील आमदार :

 

राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी). राणाजगजितसिंह पाटील (तुळजापूर), संभाजी पाटील निलंगेकर (निलंगा), रवीशेठ पाटील (पेण), चंद्रकांतदादा पाटील (कोथरूड), राघवेंद्र पाटील (धुळे ग्रामीण)

 

शिवसेनेचे पाटील आमदार :

 

अशोक पाटील (भांडुप पश्चिम), किशोर पाटील (पाचोरा), अमोल पाटील (एरंडोल), गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण), चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर).

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे पाटील आमदार :

 

अनिल पाटील (अंमळनेर), दिलीप वळसे पाटील (आंबेगाव), प्रतापराव पाटील चिखलीकर (लोहा), मकरंद जाधव पाटील (वाई), सचिन पाटील (फलटण), बाबासाहेब पाटील (अहमदपूर)

 

Shivajirao Patil : शिवाजीराव पाटील जिंकले, पण चर्चा गावातील त्या एका बहुमूल्य मताची!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पाटील आमदार :

 

रोहित पाटील (तासगाव-कवठे महंकाळ), जयंत पाटील (इस्लामपूर), नारायण पाटील (करमाळा), अभिजित पाटील (माढा).

 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पाटील आमदार :

 

कैलास घाडगे पाटील (उस्मानाबाद), डॉ. राहुल पाटील (परभणी)

 

या प्रमुख पक्षांसह शिरोळ मतदारसंघातून राजर्षी शाहू विकास आघाडीचे राजेंद्र पाटील यड्रावकर आणि चंदगड मतदारसंघातून अपक्ष लढलेले शिवाजी पाटील विधानसभेत पोहोचले आहेत.

भाजपचे 6, शिवसेनेचे 5 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 असे महायुतीचे एकूण 17 पाटील आमदार आहेत. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP) पक्षाचे 4 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 पाटील आमदार झाले आहेत. एक पाटील अपक्ष तर एक पाटील राजर्षी शाहू विकास आघाडीकडून विधानसभेत पोहोचले आहेत. काँग्रेसला 16 जागा मिळाल्या आहेत, मात्र काँग्रेसच्या या यादीत पाटील आडनावाचा एकही आमदार नाही. या पाटील मंडळींचा विधानसभेत आवाज घुमणार असून, राज्याच्या विकासासाठी तो किती मोलाचा ठरणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags