राष्ट्रहीत टाईम्स वृत्तसेवा
थेऊर, प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या पत्नी सौ. लताताई शिंदे यांनी श्रीक्षेत्र थेऊर येथे श्री चिंतामणी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भक्तिभावाने भेट दिली. दर्शनानंतर त्यांच्या हस्ते मंदिरात महाआरती करण्यात आली.
या प्रसंगी देवस्थान ट्रस्ट व शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले. सौ. शिंदे यांनी मंदिर परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली आणि याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. भविष्यात अष्टविनायक क्षेत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
या कार्यक्रमावेळी ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पीएमआरडीए अधिकारी शितल देशपांडे, सुभाष मोरे, मंडल अधिकारी किशोर जाधव, ग्रामपंचायत अधिकारी तुकाराम पाटील, माजी पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे, काळूराम कांबळे, विश्वस्त केशव विध्वंस, भरत कुंजीर, राहुल कांबळे, सुखराज कुंजीर, निलेश काळभोर, गोविंद तारू, मयुर कुंजीर, विनोद माळी, गणेश कुंजीर, गणेश चव्हाण, रामचंद्र बोडके, सोमनाथ जाधव, रायचंद जाधव तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
थेट दर्शनानंतर, थेऊर येथील महिलांच्या बचत गटांनी सौ. शिंदे यांचे औक्षण करत, त्यांचा “लाडक्या बहिणी”प्रमाणे सन्मान केला आणि कृतज्ञता व्यक्त केली. श्री चिंतामणी गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर सौ. शिंदे या पुढील अष्टविनायक दर्शनासाठी रवाना झाल्या.