वडगाव रासईच्या सभेस अभूतपूर्व गर्दी
राष्ट्रहित टाइम्स न्यूज नेटवर्क
शिरुर: घोडगंगा कारखाना सुरू करण्यासाठी लागणाऱ्या कर्ज मंजुरीसाठीची फाईल केवळ राजकीय दबावाखाली मंजुर होत नाही. मात्र २३ तारखेनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार आहे. त्यावेळी या कर्ज मंजुरीसाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे. त्यामुळे घोडगंगेचा मी सुरू करुन दाखवणारच, असा विश्वास शेतकऱ्यांना देत, तुम्ही फक्त अशोक पवारांना निवडुन देण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहा असे आवाहन ही त्यांनी मतदारांना केले.
अजित पवारांची नक्कल केली.
शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार, आमदार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची वडगाव रासाई येथे आज (गुरुवार) जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, ‘एके काळी शिरूर तालुका दुष्काळी होता. दुष्काळासाठी कामं द्या, अशी मागणी केली जात होती. पाणी आल्याशिवाय शिरूर तालुक्याचा विकास होणार नाही, हे लक्षात आले. शिरूर तालुक्यात पाणी आले, एमआयडीसी आल्यामुळे पुर्णपणे चेहरा मोहरा बदलला आहे. रावसाहेब पवार यांनी कामाच्या माध्यमातून एक आदर्श घालून दिला आहे. रावसाहेब पवार यांच्या पावलावर पाऊल ठेवून अशोक पवार काम करत आहेत. शिरूर तालुक्यानेही पक्षाला आजपर्यंत मोठी ताकद दिली आहे. यापुढेही अशीच ताकद पक्षाला द्यावी.’
शिरुरच्या शेतकऱ्यांनो ” घोडगंगा सहकारी साखर कारखाना मी सुरू करुन दाखवणारच “ हा माझा तुम्हाला शब्द आहे, मी शब्दाचा पक्का आहे. त्याबद्दल कसलीही शंका मनात ठेवू नका. घोडगंगाच नव्हे तर शिरूर हवेली मतदार संघाच्या सार्वांगिण विकासासाठी आपण स्वतः जातीने लक्ष घालणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघात ऐन निवडणुकीत कळीचा मुद्दा बनलेल्या आणि बंद असलेल्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याबाबत शरद पवार यांनी आज भर सभेत अजित पवार यांची नक्क्ल करीत पोलखोल केली. काही लोकांनी पैसे असताना, पैसे मंजूर केल्यावरही थांबवले, कारखाना सुरू करू दिला नाही. मी स्वतः बँकेशी बोललो, मुख्यमंत्र्यांना भेटलो. मात्र मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, माझी फार अडचण आहे. तुम्ही समजून घ्या. मग माझ्या लक्षात आले की हा दम देणारा कोण होता? असे म्हणत शरद पवार यांनी पक्षातील गद्दारांना चांगलेच फैलावर घेतले. पवार म्हणाले, तालुक्यातील तरूणांना हक्काच्या रोजगार उपलब्ध व्हावा, तालुका विकासाच्या वाटेवर उभा राहवा म्हणून मी औद्योगिक वसाहत शिरुर मध्ये आणली. या औद्योगिक वसाहतीमध्ये पक्षाच्या जोरावर अनेकांनी आपले बस्तान बसवले. पदे मिळवली. आणि हीच मलिदा गॅंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार पाडायला एक झाली आहे. अशा गद्दारांना शिरुर करांनी कायमचे गाडुन टाका, ही घातकी पिलावळ कायमची दुर करा असे आवाहन ही शरद पवार यांनी केले.
तर येथील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असणार्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याबाबत पवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी रावसाहेबदादा पवार व सहकार्यांनी घोगडंगाची उभारणी केली.
पवार इज पावर :- शरद पवार यांच्या आजच्या सभेसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सभेसाठी पवार साहेब येईपर्यंत दोन तास मतदार एकाच जागेवर शांतपणे बसून होते. व्यासपीठावर पवार यांनी आगमन करताच लोकांनी त्यांना उभे राहून टाळ्यांच्या गजरात मानवंदना दिली. त्यामुळे “पवार इज पावर” या अनुभुतीचा अनुभव पुन्हा एकदा आला.