
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
📌 थेऊर / हवेली तालुका प्रतिनिधी
संदेश शेठ युथ फाऊंडेशनच्या वतीने आयोजित काशी–अयोध्या दर्शन यात्रेला नागरिकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला आहे. तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात आलेल्या या यात्रेत एकूण साधारण 9 ते 10 हजार भाविकांना दर्शनाचा लाभ मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्येक टप्प्यात 3 ते 3.5 हजार नागरिकांना सुरक्षित, सुसंवाद आणि मनापासून सेवाभावाने यात्रेचा लाभ देण्यात आला.
या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे —
संदेशे आव्हाळे आणि जिल्हा परिषद थेऊर–आव्हाळवाडी गटातील इच्छुक उमेदवार कोमलताई संदेश आव्हाळे यांनी स्वतः भाविकांसोबत प्रवास केला, रेल्वेनेच भाविकांसोबत बसून सर्व व्यवस्था प्रत्यक्ष तपासल्या. प्रवासादरम्यान आलेल्या कोणत्याही अडचणी तत्काळ सोडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला, ज्यामुळे यात्रेतील सर्व नागरिकांमध्ये प्रचंड समाधानाची भावना निर्माण झाली.
प्रवासातील संवेदनशील व मानवी बाबी – फाउंडेशनचा सेवाभाव ठळकपणे जाणवला
🔹 कुंजीरवाडीतील एका महिलेचे पतीचे निधन झाले. अंत्यविधीसाठी परतणे आवश्यक होते. परिस्थितीची गंभीरता ओळखून संदेश शेठ यांनी तत्काळ विमानाची तिकीट व्यवस्था करून दिली. त्या महिलेसोबत एक स्वयंसेवकही सोबत पाठविण्यात आला, ज्यामुळे त्या बहिणीस वेळेत अंत्यविधीसाठी पोहोचता आले.
🔹 दुसऱ्या टप्प्यात एका नागरिकाला पॅरॅलिसिसचा अटॅक आला. त्या नागरिकाला उत्तम रुग्णालयात भरती करण्यात आले. संपूर्ण बिलिंग, औषधोपचार, सोबत स्वयंसेवक — सर्व खर्च व जबाबदारी फाउंडेशनकडूनच उचलण्यात आली. रुग्णाची तब्येत सुधारत नाही, तोपर्यंत स्वंयसेवक तिथेच थांबले
या दोन घटनांनी यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांच्या मनात संदेश शेठ व कोमलताई यांच्याबद्दल अपार विश्वास आणि आपलेपणा निर्माण झाला
देवदर्शन नव्हे — सेवादर्शन
राजकारणात देवदर्शन, गिफ्ट वाटप, पैसा उधळपट्टी अशा चर्चा सुरू असताना संदेश आव्हाळे व कोमलताई यांनी देवदर्शनाला सेवाधर्माची जोड देऊन एक नवा अध्याय लिहिला आहे
यामुळे नागरिकांमध्ये उमेदवारांविषयीची प्रतिमा बदलत असून —
> “नेतृत्व म्हणजे फक्त भव्य कार्यक्रम नव्हे, तर अडचणीच्या वेळची साथ”अशी भावना पक्की झाली आहे.
आई–वडिलांना काशी दर्शन — सर्वात मोठं पुण्यकार्य
हिंदू धर्मानुसार आई–वडिलांना काशीचे दर्शन घडवून आणणे अत्यंत पुण्याचं मानलं जातं. अनेक घरांमध्ये विविध कारणांनी हे साध्य होत नाही, पण
“संदेश आव्हाळे यांच्या रूपाने ते पुण्य आम्हाला मिळत आहे”
असंच मत यात्रेतून परतलेल्या बहुसंख्य वयोवृद्ध नागरिकांनी व्यक्त केले.
आतापर्यंत दोन टप्पे पूर्ण – तिसऱ्या टप्प्याबाबत उत्सुकता
पहिला आणि दुसरा टप्पा यशस्वीरीत्या पार पडला असून, तिसरा टप्पा सध्या सुरू आहे.
पहिल्या दोन टप्प्यांत भाविकांकडून मिळालेला समाधानकारक प्रतिसाद पाहता —
➡ तिसरा टप्पाही तितकाच यशस्वी होणार यात कोणतीही शंका नाही.
या यात्रेमुळे संदेश शेठ व कोमल ताई आव्हाळे यांची लोकप्रियता आणि विश्वासार्हता मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे
असा नागरिकांमधील सर्वसाधारण सूर आहे.
मानवी मूल्यांना प्राधान्य
🔹 भाविकांची सुरक्षितता प्रथम
🔹 स्वतः उपस्थित राहून सेवा करण्याची तत्परता
यामुळे या यात्रेने सामान्य देवदर्शनाच्या चौकटी पलिकडे
जाऊन एक सामाजिक–धार्मिक सेवा अभियानाचे रूप धारण केले आहे.









