राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील विद्यमान सरपंच हरेश गोठे यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश पार पडला.
या प्रवेश कार्यक्रमाला भाजपचे अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये भाजपचे राज्य महामंत्री राजेश दादा पांडे, पुणे जिल्हा अध्यक्ष मा. श्री. प्रदीप दादा कंद, भोर-वेल्हा-मुळशीचे माजी आमदार संग्राम दादा थोपटे, तसेच पुरंदरचे माजी आमदार संजयजी जगताप यांचा प्रमुख सहभाग होता.
महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. पूनम ताई चौधरी, हवेली तालुका अध्यक्ष गणेशअण्णा चौधरी, भाजप युवा वॉरियर्सचे तालुका अध्यक्ष कु. संग्रामभैय्या कोतवाल, भाजप सोशल मीडिया प्रमुख आदेश जाधव, कोरेगावमूळचे माजी सरपंच कु. मंगेश दादा कानकाटे आणि आप्पा गोरे हेही यावेळी उपस्थित होते.
सरपंच हरेश गोठे यांच्यासोबत कुंजीरवाडी गावातील अनेक मान्यवरांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामध्ये युवा उद्योजक गजानन भाऊ जगताप, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदूमामा बारवकर, संदीप गायकवाड, अक्षय फडतरे व ओंकार कुंजीर यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमास कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली होती. सरपंच हरेश गोठे यांच्या भाजप प्रवेशामुळे कुंजीरवाडी परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे.