राष्ट्रहित टाइम्स न्यूज नेटवर्क
थेऊर: कोलवडी ता. हवेली ग्रामपंचायत कोलवडी साष्टे गावामध्ये विविध निधीच्या माध्यमातून गावामध्ये विकास कामांचा शुभारंभ (दि २५) रोजी पार पडला यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणे ५५ लाख ५० हजार रुपये, काकाश्री पार्क रस्ता काँक्रिटीकरण करणे २० लाख रुपये, नवीन ग्राम सचिवालय बांधकाम करणे,
कोलवडी स्मशानभूमी संरक्षक भिंत करणे २० लाख रुपये, साष्टे स्मशानभूमी रस्ता करणे दहा लाख रुपये माऊली नगर रस्ता करणे १०लाख ,रुपये जिल्हा परिषद शाळा साष्टे शौचालय बांधणे ४ लाख रुपये, साठे नगर रस्ता करणे ५ लाख रुपये, साळुंखे वस्ती रस्ता करणे ५ लाख रुपये, कोलवडी- मांजरी रोड चौक सुधारणा करणे ४ लाख रुपये, जिल्हा परिषद शाळा कोलवडी शौचालय बांधणे ३ लाख रुपये, जिल्हा परिषद शाळा, गायकवाड वस्ती शौचालय बांधणे ३ लाख रुपये अशा विविध कामांचे भूमिपूजन शुभारंभ करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रम प्रसंगी यशवंत कारखान्याचे संचालक रामदास आण्णा गायकवाड मा. संचालक मिलापचंद गायकवाड, जयसिंग गायकवाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत गायकवाड , सरपंच विनायक गायकवाड , उपसरपंच रमेश मदने , मा.सरपंच सतिष गायकवाड, मा.उपसरपंच बाळासो भाडळे ,म्हस्कु गायकवाड, दिलीप गायकवाड, विकास कांचन, विलास भोसले, दत्तात्रय कदम नानासो मुरकुटे,अशोक गायकवाड, उत्तम जगताप, शंकर मदने, अविनाश रिकामे, सोसायटीचे चेअरमन विजय गायकवाड,शरद गायकवाड,धनजी गायकवाड, माऊली रिकामे,विश्वास गायकवाड, पंकज गायकवाड पोलिस पाटील मिनाताई गायकवाड
तसेच ग्रामपंचायत सदस्य सचिन गायकवाड, निलेश रिकामे, संदिप गायकवाड, स्वप्निल नितनवरे, योगेश मुरकुटे, शितल अविनाश भाडळे, चैत्राली अजित गायकवाड, स्वाती अजित गायकवाड, प्रिया दिगंबर गायकवाड, निशा श्रीकांत भोर, निता सोमनाथ भालसिंग, प्रियंका धनंजय शितोळे ग्रामविकास अधिकारी प्रवीण खराडे व ग्रामस्थ उपस्थित होते.