आमदार अशोक पवार आणि त्यांच्या बगलबच्चांच्या सात पिढ्या खाली आल्या तरी योजना पूर्ण होणार. चित्तरंजन गायकवाड

Facebook
Twitter
WhatsApp

राष्ट्रहित टाइम्स

लोणी काळभोर : कदमवाकवस्ती ता.हवेली येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जलजीवन मिशन योजनेत घोटाळा झाला आहे असा आरोप कदमवाकवस्ती चे माजी सरपंच देवानंद काळभोर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे.

हा आरोप हवेली तालुका समन्वयक समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आला . या बैठकीला विद्यमान आमदार अशोक पवार उपस्थित होते. या आरोपाला अनुसरून एमजीपी चे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे यांना सदरील कामाची चौकशीची व चौकशी पूर्ण होईपर्यंत काम बंद ठेवावी अशी मागणी वजा सूचना आमदार अशोक पवार यांनी केली. या बैठकीमध्ये नवपरिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांच्यावर विविध प्रकारचे आरोप करण्यात आले. त्यामध्ये आमदार अशोक पवार यांनी आरोप केला की ,काम करणाऱ्या कॉन्टॅक्टर चा नंबर सार्वजनिक का करत नाहीत? , चित्तरंजन गायकवाड व प्रीतम गायकवाड यांनी आपली वैयक्तिक पाईप लाईन यामध्ये केलेले आहे व सदरील काम फक्त वार्ड क्रमांक १ व ६ मध्ये सुरू असून बाकी वार्डमध्ये साधा सर्व्ह देखील झाला नाही असा आरोप केला आहे.

या संदर्भात प्रतिउत्तर देण्यासाठी चित्तरंजन गायकवाड व माजी लोकनियुक्त सरपंच गौरी गायकवाड यांच्यासह १५ ग्रामपंचायत सदस्य यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या पत्रकार परिषदेत माहिती देताना चित्तरंजन गायकवाड म्हणाले की, कॉन्ट्रॅक्टर चा नंबर घेऊन आमदार व त्यांच्या बगलबच्याना काम पाहिजे का दाम पाहिजे.हा नंबर घेऊन हे लोक सुरू असलेली ही चांगली योजना बंद करतील अन्यथा या कॉन्ट्रॅक्टदाराला पैसे मागतील.विशेष म्हणजे कार्यक्षम आमदार यांना आपल्या मतदार संघात नेमके कोणती कामे कोणत्या कॉन्ट्रॅक्टदाराकडे आहे याची देखील माहिती नसेल तर हे अतिशय निंदनीय आहे.यावरून कळते की आमदारांनी किती विकास या भागात केलेला आहे.त्याचसोबत शेतकऱ्यांचा कळवळा असणाऱ्या आमदारांनी एका शेतकऱ्याच्याच पाईप लाईनला विरोध करत असतील तर ती मी उद्या काढून टाकतो.२०१२ साली दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना त्रिंबक सर्जेराव गायकवाड व सरस्वती त्रिंबक गायकवाड या शेतकऱ्यांनी पांडवदंड आणि फुरसुंगी मधील काही भागाला आपल्या शेतातील चालू पिके जाळून पाणी पुरवठा केलेला आहे.त्याचसोबत याठिकाणी प्रत्येक वॉर्डातील सदस्य असून त्यांच्या उपस्थितीत प्रत्येक वार्डाचे सर्वेक्षण केव्हाच पार पडले आहे याची विचारणा तुम्ही सदरील सदस्यांना करू शकता.

ते पुढे म्हणाले की,विद्यमान आमदार यांनी आमच्या भागात गरजेप्रमाणे विकास कामे न केल्याने या कामाचे श्रेय लाटण्याचे काम सध्या ते करत आहेत.तरी मी आमदारांना सांगू इच्छितो की येथील जनतेला मी पाण्याचा थेंब कमी पडू देणार नाही व ही योजना कसल्याही परिस्थीत पूर्ण करून दाखवेल.जर येत्या काही दिवसात काम सुरू झाले नाही तर मी व माझी पत्नी आमरण उपोषण करणार आहे. आमदार अशोक पवार यांनी जो कदमवाक वस्ती मध्ये निधी दिला तो क्रिस्टल या खाजगी सोसायटी मध्ये रस्ता करून दिला जो की त्या बिल्डरने तो रस्ता करणे गरजेचे आहे तो रस्ता सरकारी पैशात केला गेला आहे . आमदार व त्यांच्या बगलबच्चांनी जे आरोप केले आहेत त्या संदर्भात इथून पुढे एक एक करून पुराव्यानिशी उत्तर देऊन त्यांची पोलखोल करणार आहे.

वार्ड क्रमांक २ मधील सामाजिक कार्यकर्ते तुषार मोहन काळभोर यांनी आरोप केला की आमदारांनी रस्त्यासाठी आमच्या वार्डात जो दहा लाखांचा निधी दिला आहे तो केवळ खाजगी मोबाईल टॉवर कडे जाणाऱ्या रस्त्यासाठी दिला आहे.

लोकसभेला कदमवाकवस्ती येथून महायुतीच्या आढळराव पाटील यांना मतदानाची लीड दिल्यामुळे आमदार व त्यांचे बगलबच्चे असे आरोप करत आहेत. मी एक सामान्य नागरिक म्हणून सुद्धा ही योजना बंद पडू देणार नाही.: चित्तरंजन गायकवाड अध्यक्ष नवपरिवर्तन फाउंडेशन.

 

विद्यमान आमदारांना शिरूर मधील कारखान्यांच्या व्यवस्थेतील वापरला जाणारा घोटाळा या शब्दाची सवय झाल्याने त्यांना या योजनेत देखील घोटाळा दिसत आहे. :

गौरी गायकवाड

माजी लोकनियुक्त सरपंच कदमवाकवस्ती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags