नगर दक्षिणचे नूतन खासदार निलेश लंके यांच्या विजयाचे पारनेर तालुक्यात जल्लोषात स्वागत निसर्गाने ही दिली साथ.

Facebook
Twitter
WhatsApp

पारनेर [- नगर दक्षिण चे खासदार म्हणून माजी आमदार निलेश लंके यांच्या निवडीचे पारनेर तालुक्यात फटाक्यांची आतिषबाजी , गुलाल व भंडाऱ्याची उधळण , डी जे च्या गजरात व कार्यकर्त्यां नी बेधुंद नाचत भव्य दिव्य आनंद साजरा केला . यावेळी निसर्गाने ही दिली साथ , कार्यकर्ते ही खूश .
पारनेर तालुक्यातील एका सामान्य सेवानिवृत्त शिक्षकाचा मुलगा असलेल्या व लोकसभेच्या निवडणूकी साठी विधानसभेची आमदार की सोडून लोकसभेच्या आखाड्यात उतरलेले शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांनी नगर जिल्ह्या चा अभेद्य तटबंदी असलेल्या विखे पाटील घराण्याला जबरदस्त हादरा देत लोकसभे चा गड सर केल्याने पारनेर तालुक्यातील त्यांच्या कार्यकर्ते प्रचंड गुलाल व भंडाऱ्याची उधळण , फटाक्यांची मोठी आतिषबाजी , डि . जे . च्या साग्र संगीताच्या तालावर नाचत होते . या मिरवणुकीत प्रमुख नेत्यांना कार्यकर्ते खांदयावर घेवून जल्लोष करताना दिसून येत होते . यावेळी नूतन खासदार निलेश लंके व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विजयी घोषणांनी संपूर्ण पारनेर तालुका दणाणून गेला . या विजयी मिरवणूकीला निसर्गाने ही पावसाच्या सरी च्या रूपाने तालुक्यात सहभाग नोंदविल्याने कार्यकर्त्यां चा उत्साह दुणावल्याने त्यांच्यात उत्साह संचारला .
नूतन खासदार निलेश लंके यांचा आज वाटणारा विजय , दिसतो तितका सोपा नव्हता , त्यासाठी त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून रात्री चा दिवस करून संपूर्ण नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ पिंजून काढावा लागला . प्रत्येक कार्यकर्ता व मतदार यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अहोरात्र घेतलेली मेहनत आज खऱ्या अर्थाने फळाला आली . तसे पाहता मावळते खासदार डॉ . सुजय विखे पाटील यांना लोकसभे ला पराभूत करणे , हे खूप कठीण नव्हे तर महाकठीण होते , त्यांचे पिताश्री राज्याच्या मंत्रीमंडळात मानाचे मंत्री पद असलेले वजनदार मंत्री , भाजपाच्या देश पातळीवरील नेत्यांपर्यंत थेट संपर्क असलेले , सहकार , साखर , शिक्षण सम्राट व जिल्हयाचे पालकमंत्री असलेले अनुभवी व हुशार मंत्री ना . राधाकृष्ण विखे पाटील व राज्यात गाजलेल्या नगर जिल्हा परिषदेच्या अभ्यासू व माजी अध्यक्षा असलेल्या सौ . शालिनी ताई विखे पाटील यांचे चिरंजीव . नगर जिल्ह्यातील सर्व संस्थांवर असलेले वर्चस्व व जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या प्रवरे ची यंत्रणा या प्रवरेच्या यंत्रणे चा जिल्ह्यात अनेकांना धडकी बसलेली आहे . पण या यंत्रणे पुढे निलेश लंके यंत्रणा व ज्येष्ठ शरद पवार यांचा आशिर्वाद भारी ठरला आहे .
पण नूतन खासदार निलेश लंके यांच्या विजयाने कार्यकर्त्यां नी हुरळून जाऊन चुकीचे पाऊल उचलू नये व पराभूत मावळते खासदार सुजय विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी पराभव जिव्हारी लागून घेवू नये , पुन्हा नव्या जोमाने नव्याने कामाला लागावे व दोन्ही ही बाजूने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात केंद्र सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी आणून प्रलंबित विकास कामे पूर्ण करावीत व मोठ्या प्रमाणावर नूतन विकास कामे करावीत , नगर दक्षिण मतदार संघातील जनतेला हेच अपेक्षीत आहे . एकमेकांची जिरवा , जिरवी करू नये , म्हणजे झाले , बाकी काय ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags