राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
शिरूर -हवेली विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे पै.ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी म़ोठ्या मताधिक्याने विजय मिळवत विद्यमान आमदार अशोक पवार यांचा पराभव केला.
शिरूर -हवेलीचा श्रावणबाळ अशी ओळख असलेल्या कटके यांनी सुरुवातीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत टिकवुन जवळपास ७४६८६ मतांनी विजय मिळवला.मोफत उज्जैन यात्रा,लाडकी बहिण योजना,व महायुती मधील सर्वच घटक पक्षांनी एकत्रित उभी केलेली प्रचारयंत्रणा यामुळे माऊली कटकेंचा विजय सोपा झाला.