राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
लोणी काळभोर प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवणाऱ्या आजाद समाज पार्टी (कांशीराम) या पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी संजय भास्कर आवारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा. कांतीलाल ठोके यांच्या उपस्थितीमध्ये गौरी प्रसाद उपासक केंद्रीय प्रभारी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
पक्षाच्या कोकण व पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. या प्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व विचारवंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजय आवारे यांना फुलांचा गुच्छ देत सन्मानित करण्यात आले.
पक्षाच्या कार्यात आणि सामाजिक क्षेत्रात त्यांच्या सक्रिय सहभागामुळे, नेतृत्वगुण, आणि कटिबद्धतेची दखल घेऊन ही जबाबदारी देण्यात आली असल्याचे ठोके यांनी सांगितले. “आपल्याला दिलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडू,” असा विश्वास संजय आवारे यांनी यावेळी व्यक्त केला.
या निवडीमुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आजाद समाज पार्टीच्या कार्याला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे