शिरुर-हवेली विधानसभेचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांचा शिंदवणे येथे नागरी सत्कार

Facebook
Twitter
WhatsApp
राष्ट्रहित टाईम्स न्यूज नेटवर्क
   नव्या जुन्या सहकार्यांना एकत्रित करून विकासाची मोट बांधणार. खुणशीचे राजकारण न  करता विकासाचे रान पेटवणार.गावा-गावात गट तट तयार करण्यापेक्षा समेट घडवणार.असे प्रतिपादन शिरूर हवेली मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार माऊली आबा कटके यांनी शिंदवणे येथील गाव भेट दौरा दरम्यान सत्कार ला उत्तर देताना केले

   गुरुवार, दि. १२ डिसेंबर, २०२४ रोजी ग्रामपंचायत शिंदवणे, ता. हवेली, जि. पुणे येथे शिरुर-हवेली विधानसभेचे नवनियुक्त आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांचा आभार मेळावा व नागरी सत्कार सरपंच सारीका दिनानाथ महाडीक यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

     कार्यक्रमाच्या अनुषंगाने दैनिक लोकमतचे पत्रकार सहदेव खंडागळे, दैनिक सकाळचे पत्रकार सुवर्णा कांचन, दैनिक सामनाचे पत्रकार भाऊसो. महाडीक, दैनिक पुण्य नगरीचे पत्रकार नितीन करडे, साप्ताहिक राष्ट्रहित टाईम्सचे संपादक आनंद वैराट, संघ नायक न्यूजचे उपसंपादक शामराव जगताप यांचा आमदार कटके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी ग्राम विकास अधिकारी राजेंद्र जगताप, माजी सरपंच तथा तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गणेश महाडीक, माजी सरपंच संजय डोंबाळे, समाज परिवर्तन ब्रिगेडचे सदाशिव कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली.*

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा युवा अध्यक्ष आण्णा महाडीक, हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य अलंकार कांचन, उपसरपंच भाग्यश्री शिंदे, रयत शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष महाडीक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी, संतोष आबा कांचन, मणिभाई देसाई पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र कांचन, शिवसेनेचे शामराव माने, विपुल शितोळे तसेच सुदाम महाडीक, रामभाऊ महाडीक, भुजंग महाडीक, संभाजी महाडीक, दत्तात्रय कुलाळ, सचिन शिंदे, आण्णा खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags